लव रंजनच्या सिनेमात रणबीरसोबत दीपिकाची नाही तर ही अभिनेत्रीची लागली वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 11:17 IST2019-04-02T11:08:28+5:302019-04-02T11:17:25+5:30

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणची जोडी ऑनस्क्रिन आणि ऑफ स्क्रिन दोन्हीकडे चर्चेत होती. ब्रेकअपनंतर ही या जोडीची फॅन फॉलोइंगमध्ये फारसा फरक पडलेला नाही

Deepika padukone wont be teaming up with ranbir kapoor for the luv ranjan movie | लव रंजनच्या सिनेमात रणबीरसोबत दीपिकाची नाही तर ही अभिनेत्रीची लागली वर्णी

लव रंजनच्या सिनेमात रणबीरसोबत दीपिकाची नाही तर ही अभिनेत्रीची लागली वर्णी

ठळक मुद्दे अजय देवगण आणि रणबीर कपूरसोबत दीपिका पादुकोण नसणार आहेजान्हवी कपूरने या सिनेमासाठी तिचे लुक टेस्टदेखील झाले आहे

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणची जोडी ऑनस्क्रिन आणि ऑफ स्क्रिन दोन्हीकडे चर्चेत होती. ब्रेकअपनंतर ही या जोडीची फॅन फॉलोइंगमध्ये फारसा फरक पडलेला नाही. दोघांचे फॅन्स ब्रेकअपनंतर देखील त्यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 'तमाशा'नंतर लव रंजनच्या आगामी सिनेमात ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे अशी चर्चा होती. या बातमीमुळे त्यांचे फॅन्स चांगलेच खुश झाले होते. मात्र आता त्यांची काहीशी निराशा होण्याची शक्यता आहे. त्याला कारण ही तसेच आहे. 


स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार लव रंजनच्या आगामी सिनेमात अजय देवगण आणि रणबीर कपूरसोबतदीपिका पादुकोण नसणार आहे. यावेळी जे नवं नावसमोर येतेय ते अभिनेत्री जान्हवी कपूरचे आहे. जान्हवीने या सिनेमाची कथा ऐकली आहे आणि ती तिला खूप आवडलीदेखील आहे. 

ऐवढंच नाही तर यासिनेमासाठी तिचे लुक टेस्टदेखील झाले आहे. त्यामुळे या सिनेमात दीपिका पादुकोणची नाही तर जान्हवी कपूरची वर्णी लागण्याची शक्यता आहे.  


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर  रणबीर लवकरच 'ब्रह्मास्त्र'मध्ये एकत्र दिसणार आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा अयान मुखर्जी दिग्दर्शित करतो आहे. 'ब्रह्मास्त्र’ या सिनेमात रणबीर कपूरसह आलिया भट्ट, महानायक अमिताभ बच्चन,मौनी राय आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन मुख्य भूमिकेत आहेत.'ब्रह्मास्त्र' ख्रिसमसच्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करिअरच्या सुरूवातीला रणबीरने रोमॅन्टिक चित्रपट केलेत. या चित्रपटाने त्याची  लव्हरबॉय  ही इमेज तयार केली. पण आता तो या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करतो आहे.

Web Title: Deepika padukone wont be teaming up with ranbir kapoor for the luv ranjan movie