OMG!! ये क्या पहन लिया बहन...? दीपिका पादुकोणचा अतरंगी ड्रेस पाहून सगळेच झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 10:22 IST2019-12-31T10:21:11+5:302019-12-31T10:22:13+5:30

दीपिकाने ‘छपाक’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये असा काही ड्रेस घातला की, ती लगेच ट्रोल झाली.  

deepika padukone wears a corset with a twist for chhapaak promotions and get trolled | OMG!! ये क्या पहन लिया बहन...? दीपिका पादुकोणचा अतरंगी ड्रेस पाहून सगळेच झाले हैराण

OMG!! ये क्या पहन लिया बहन...? दीपिका पादुकोणचा अतरंगी ड्रेस पाहून सगळेच झाले हैराण

ठळक मुद्देदीपिकाच्या ‘छपाक’ या सिनेमाबद्दल सांगायचे तर हा सिनेमा अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर बेतलेला आहे.

दीपिका पादुकोण तिच्या स्टाईल आणि क्लासिक फॅशनसाठी ओळखली जाते. इव्हेंट कुठलाही असो दीपिका भाव खाऊन जाते. बहुतांशवेळा दीपिका तिचा आवडता डिझाईनर सब्यसाची याने डिझाईन केलेल्या साडीत दिसते. पण सोमवारी दीपिकाने ‘छपाक’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये असा काही ड्रेस घातला की, ती लगेच ट्रोल झाली.  ‘शादी के साईड इफेक्ट्स’अशा शब्दांत इंटरनेट युजर्सनी तिचा तो विचित्र अवतार पाहून प्रतिक्रिया दिली.  इतकेच नाही तर काहींनी तिला ‘लेडी रणवीर सिंग’ हे विशेषण बहाल केले.


सोमवारी दीपिका एका हॉटेलमध्ये ‘छपाक’च्या प्रमोशनसाठी पोहोचली. यावेळी व्हाईट कलरचा शर्ट आणि ओव्हर साइज्ड ढगळ असा ब्ल्यू जीन्स तिने परिधान केला होता. पण सर्वात विचित्र म्हणजे, या पांढ-या शर्टवर दीपिकाने ब्लॅक कोरसेट घातला होता. दीपिकाने शर्टावर कोरसेट घातलेला पाहून सगळेच अवाक् झाले आणि अनेकांनी तिला ट्रोल करणे सुरु केले.


आत्तापर्यंत दीपिकाचा पती रणवीर सिंगचे अतरंगी कपडे सर्वांनी पाहिले होते. पण आता दीपिकाही रणवीरसारखी विचित्र फॅशन करायला लागली म्हटल्यावर हा सगळा त्याच्याच संगतीचा परिणाम असल्याची प्रतिक्रिया बहुतांश युजर्सनी दिली.

‘ये क्या पहन लिया बहन...,’ असे एक युजर दीपिकाचा ड्रेस पाहून म्हणाला. तर अन्य एका युजरने ‘केवळ दीपिकाच असे काही घालू शकते,’ असे लिहिले. एका युजरने तर तिची तुलना चक्क सुपरमॅनसोबत केली. जो पँटवर अंडरवीअर घालतो.


दीपिकाच्या ‘छपाक’ या सिनेमाबद्दल सांगायचे तर हा सिनेमा अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर बेतलेला आहे. यात दीपिका लक्ष्मीची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. येत्या 10 जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

Web Title: deepika padukone wears a corset with a twist for chhapaak promotions and get trolled