अर्ध्या रात्री दीपिकाला आठवला शाहरुख खान, काय असेल या मागचे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 11:48 IST2019-10-01T11:48:53+5:302019-10-01T11:48:59+5:30

शाहरुख खान गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमांपासून दूर आहे. गेल्या वर्षी शाहरुखचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही

Deepika padukone tweeted to shahrukh khan you were supposed to call me | अर्ध्या रात्री दीपिकाला आठवला शाहरुख खान, काय असेल या मागचे कारण?

अर्ध्या रात्री दीपिकाला आठवला शाहरुख खान, काय असेल या मागचे कारण?

शाहरुख खान गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमांपासून दूर आहे. गेल्या वर्षी शाहरुखचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही. सध्या शाहरुख आपल्या कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करतोय. एवढेच नाही तर शाहरुखने एका दिवसापूर्वी घरातील लायब्ररीची देखील साफ-सफाई केली. शाहरुखने सोशल मीडियावर फोटो शेअर करत पर्सनल लायब्ररी साफ केल्याचे सांगितले यावर दीपिका पादुकोणने रात्री 1 वाजून 20 मिनिटांने रिट्वीट केले. दीपिकाने रिट्वीट करत म्हटले आहे, की तू मला फोन फोन करणार होतास. साफ-सफाई करण्याच्या नादात शाहरुख त्याच्या मैत्रिणीला फोन करायचे कदाचित विसरुन गेला असावा. आता दोघांमध्ये नक्की कोणत्या सिनेमाला घेऊन चर्चा होणार होती हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 




दीपिकाने बॉलिवूडमध्ये पदार्पण शाहरुख खानच्या ओम शांति ओम सिनेमातून केले होते. त्यानंतर दोघे चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू इअर सारख्या सिनेमात एकत्र दिसले होते.


वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर शाहरुखने फॅन्स त्याच्या सिनेमाची वाट मोठ्या आतुरतेने पाहत आहेत. झिरोनंतर त्याने एकही सिनेमा साईन केलेला नाही. तर दीपिका पादुकोणचा छपाक सिनेमा जानेवारीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून दीपिकाने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. छपाक सिनेमा अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवाल हिच्या संघर्षाची आणि खडतर प्रवासाची कथा रेखाटण्यात आली आहे. यात लक्ष्मीच्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसणार आहे.

Web Title: Deepika padukone tweeted to shahrukh khan you were supposed to call me