"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 10:38 IST2025-05-08T10:37:35+5:302025-05-08T10:38:06+5:30
प्रेग्नंसी आणि आता पोस्टपार्टमबद्दल दीपिका म्हणाली...

"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. तिचं नाव 'दुआ' असं ठेवण्यात आलं. वयाच्या ३९ व्या वर्षी ती आई झाली. प्रेग्नंसीच्या काळात दीपिकाने काही इव्हेंट्सलाही हजेरी लावली. इतकंत नाही तर सुरुवातीच्या काळात तिने 'सिंघम अगेन' सिनेमाचं शूटिंगही केलं. मात्र प्रेग्नंसीचे शेवटचे दोन महिने खूप कठीण गेल्याचा खुलासा दीपिकाने केला आहे.
एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत दीपिका पदुकोण तिचा प्रेग्नंसीचा प्रवास सांगता म्हणाली, "माझ्यासाठी ते खूप कठीण होतं. बरेच कॉम्प्लिकेशन्स आले. विशेषत: आठव्या आणि नवव्या महिन्यात मी बऱ्याच अडचणींना सामोरी गेले. शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या होणारे परिणाम लक्षणीय होते."
ती पुढे म्हणाली, "आई होण्याची भावना माझ्यात खूप पूर्वीपासून होती. जेव्हा माझ्या लहान बहिणीचा जन्म झाला माझ्यामध्ये ममता जागी झाली होती. बहिणीची काळजी घेणं, तिला सुरक्षित ठेवणं हे माझ्यामध्ये आपोआपच आलं होतं. आई होण्याचा माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. मी फक्त योग्य वेळेची वाट पाहत होते."
मॉम गिल्ट
दीपिका म्हणाली, "आता पूर्वीसारखं जास्त काम करता येईल की नाही माहित नाही. सध्या दुआ माझ्यासाठी पहिलं प्राधान्य आहे. मात्र आई झाल्यानंतर आयुष्य थांबत नाही हे मी स्वत:ला सांगत आहे. त्यामुळे आपण पुन्हा काम सुरु केलं पाहिजे असं मी स्वत:ला सांगितलं. पण जेव्हा जेव्हा मी दुआला सोडून घराबाहेर जाते मला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं."