दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचे फॅन्स आहात तर, ही बातमी नक्कीच वाचा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 16:10 IST2019-10-22T16:10:03+5:302019-10-22T16:10:09+5:30
दोघांची केमिस्ट्री रसिकांना खूपच आवडली आहे.

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचे फॅन्स आहात तर, ही बातमी नक्कीच वाचा !
दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खुशखबर आहे. दीपिका आणि रणबीर लवकरच लव रंजनच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. रणबीर व दीपिका बचना ए हसीनो, ये जवानी है दीवानी व तमाशा यांसारख्या सिनेमात एकत्र झळकले आहेत.
या सिनेमामधील त्यांची केमिस्ट्री रसिकांना खूपच भावली होती. गेल्या काही दिवसांपासून ते दोघे पुन्हा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याचे बोलले जात आहे. इंडिया टिव्हीच्या रिपोर्टनुसार हा एक रोमाँटीक कॉमेडी सिनेमा आहे. टिव्हीवरील जाहिरातीनंतर दोघे सिनेमात एकत्र दिसणार आहेत.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, दीपिका पादुकोणचा छपाक सिनेमा पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून दीपिका निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे. तसेच ती रणवीर सिंगसोबत 83 सिनेमातदेखील झळकणार आहे.या सिनेमात ती क्रिकेटर कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. रणवीर सिंह या सिनेमात क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र' आणि शमशेराच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.