पुन्हा एकदा रणबीर कपूरची होणार दीपिका पादुकोण, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 21:00 IST2018-10-09T20:55:11+5:302018-10-09T21:00:55+5:30
बॉलिवूडमधील जेव्हा कधीही हिट जोड्यांबाबत चर्चा होते तेव्हा त्या लिस्टमध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचे नाव सामील होते.

पुन्हा एकदा रणबीर कपूरची होणार दीपिका पादुकोण, वाचा सविस्तर
बॉलिवूडमधील जेव्हा कधीही हिट जोड्यांबाबत चर्चा होते तेव्हा त्या लिस्टमध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूरचे नाव सामील होते. रणबीर आणि दीपिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावते. दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्या फॅन्ससाठी आमच्याकडे खूशखबर आहे. लवकरच ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. सोनू के टीटू के स्वीटी सारख्या सुपरहिट सिनेमाचे दिग्दर्शन केलेल्या लव रंजन यांच्या सिनेमात रणबीर आणि दीपिका एकत्र दिसू शकतात.
डीएनएच्या रिपोर्टनुसार, लव रंजनचा पुढचा सिनेमा मल्टी स्टारर आहे. या सिनेमात अजय देवगण, तब्बू आणि रणबीर कपूर यांचे नाव आधीच सामील होते. यात आता दीपिकाचे नावाही सामील होताना दिसतेय. नुकतीच या सिनेमाची स्क्रिप्ट दीपिकाने वाचली आहे. दीपिकाने अजून सिनेमासाठी होकार दिलेला नाही. पण जर दीपिकाने होकार दिला तर लवकरच या जोडीचा रोमान्स पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळेल,
रणबीर आणि दीपिकाने आतापर्यंत तीन सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. ज्यात ए हसीनों’ ‘ये जवानी है दीवानी’ आणि 'तमाशा' सारखे सिनेमा सामील आहेत. दीपिका आणि रणबीर हे रिअल लाईफमध्ये सुद्धा कपल होते. मात्र त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. दीपिकाच्या आयुष्यात रणवीरची एंट्री झाली तर रणबीरच्या आयुष्यात आलियाची. लवकरच दीपिका आणि रणवीर लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे समजतेय.