बॉलिवूडच्या 'या' महागड्या सिनेमात आमिर खानसोबत दिसू शकते दीपिका पादुकोण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 14:23 IST2018-10-09T14:07:28+5:302018-10-09T14:23:55+5:30

पद्मावतीनंतर दीपिका पादुकोण प्रत्येक दिग्दर्शकाची पहिली चॉईस बनली आहे. प्रत्येक मोठ्या कलाकाराला दीपिकासोबक काम करण्याची इच्छा आहे.

Deepika Padukone may appear with Aamir Khan in this Big project | बॉलिवूडच्या 'या' महागड्या सिनेमात आमिर खानसोबत दिसू शकते दीपिका पादुकोण

बॉलिवूडच्या 'या' महागड्या सिनेमात आमिर खानसोबत दिसू शकते दीपिका पादुकोण

ठळक मुद्देसोमवारी रात्री उशीरा आमिरला भेटण्यासाठी दीपिका त्याच्या घरी गेली होती'महाभारत' सिनेमात द्रौपदीच्या भूमिकेसाठी दीपिकाचे नाव समोर येतेय

पद्मावतीनंतर दीपिका पादुकोण प्रत्येक दिग्दर्शकाची पहिली चॉईस बनली आहे. प्रत्येक मोठ्या कलाकाराला दीपिकासोबक काम करण्याची इच्छा आहे. याच दरम्यान आमिर खानच्या 'महाभारत' सिनेमात द्रौपदीच्या भूमिकेसाठी दीपिकाचे नाव समोर येतेय. सोमवारी रात्री उशीरा आमिरला भेटण्यासाठी दीपिका त्याच्या घरी गेली होती.    


दीपिका सोबत दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी आणि सिद्धार्थ राय कपूरसुद्धा आमिर खानच्या घरी गेले होते. आमिर खानचा ठग्स ऑप हिंदोस्तान सिनेमा नोव्हेंबर 8ला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आमिर नवा प्रोजेक्टची घोषणा काही दिवसांनंतर करण्याची शक्यता आहे.   
महाभारत या सिनेमाची कथा ही एम. टी. वसुदेवन यांच्या Randamoozham या कादंबरीवर आधारीत आहे. या चित्रपटात आमिर खान कृष्णाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या साठी मुकेश अंबानी 1000 कोटींची गुंतवणूक करणार आहेत.  एकता कपूरचा नुकताच आलेल्या सिनेमामध्ये त्यांनी पैसे गुंतवले होते. आमिर खानच्या महत्वाच्या महाभारत सिनेमामध्ये मुकेश अंबानी हे सह-निर्माता असणार आहेत. या वृत्ताला मुकेश अंबानी किंवा आमिर खान यांनी दुजोरा दिला नाही. पण वॉयकॉम 18 या आपल्या जुन्या कंपनीमार्फत मुकेश अंबानी गुंतवणूक करणार की नव्या कंपनीमार्फत करणार हे लवकरच जाहीर होईल. 


मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि थलायवा रजनीकांत या सिनेमाद्वारे सिल्व्हर स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमात रजनीकांत भीष्म पितामह आणि आमिर कृष्णाच्या भूमिकेत पाहायला मिळतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी सिनेमा तमीळ, तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये डब केला जाणार आहे.  

Web Title: Deepika Padukone may appear with Aamir Khan in this Big project