​ ‘पद्मावत’च्या स्क्रिनिंगला हातात हात घालून दिसले लव्हबर्ड्स रणवीर सिंग अन् दीपिका पादुकोण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 10:29 IST2018-01-24T04:49:21+5:302018-01-24T10:29:22+5:30

‘पद्मावत’ हा वादग्रस्त चित्रपट अखेर उद्या गुरुवारी देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार. तत्पूर्वी काल मुंबईत या चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले. ...

Deepika Padukone, Loveworld, Ranveer Singh and 'Padmavat' have put their hands in screening! | ​ ‘पद्मावत’च्या स्क्रिनिंगला हातात हात घालून दिसले लव्हबर्ड्स रणवीर सिंग अन् दीपिका पादुकोण !

​ ‘पद्मावत’च्या स्क्रिनिंगला हातात हात घालून दिसले लव्हबर्ड्स रणवीर सिंग अन् दीपिका पादुकोण !

द्मावत’ हा वादग्रस्त चित्रपट अखेर उद्या गुरुवारी देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार. तत्पूर्वी काल मुंबईत या चित्रपटाचे स्क्रिनिंग पार पडले. या स्क्रिनिंगला ‘पद्मावत’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसह सगळी स्टारकास्ट उपस्थित होती. पण या स्क्रिनिंगवेळी सर्वाधिक लक्ष वेधले ते रणवीर सिंग व दीपिका पादुकोण या लव्हबर्ड्सने.





रणवीर व दीपिका एकाच गाडीतून स्क्रिनिंगला आलेत आणि नंतर एकमेकांच्या हातात हात घालून त्यांनी ग्रॅण्ड एन्ट्री घेतली. पुढे काय झाले असणार, याचा अंदाज तुम्ही बांधू शकताच.





रणवीर व दीपिकाची एन्ट्री झाली आणि हातात हात घालून आलेल्या लव्हबर्ड्सवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या.  अखेर आम्ही जिंकलोच, असा त्यांचा थाट होता. विशेषत: दीपिका यावेळी प्रचंड आनंदी आणि उत्साही दिसली. दोघांचा ट्रॅडिशनल लूकही सगळ्यांना सुखावून गेला.



शाहिद कपूरची अख्खी फॅमिली या स्क्रिनिंगला उपस्थित होती. शाहिदचे वडिल पंकज कपूर, आई नीलिमा अझीम, बहीण सना कपूर,  भाऊ इशान खट्टर असे सगळे यावेळी हजर होते.





ALSO READ : Padmaavat Quick Movie Review: ‘बाहुबली’ची भव्यता गाठणारा ‘पद्मावत’

शाहिदच्या सासूबार्इंनीही या स्क्रिनिंगला हजेरी लावली. शाहिद व मीरा राजपूत या दोघांनी स्क्रिनिंगला एकत्र एन्ट्री घेतली. 
संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ सुरुवातीपासूनच वादात सापडला आहे. या चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत अनेक राजकीय पक्ष व राजपूत संघटनांनी ‘पद्मावत’ला विरोध चालवला आहे. हा विरोध लक्षात घेत, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि हरियाणा या राज्यांनी ‘पद्मावत’च्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. या बंदीमुळे ‘पद्मावत’च्या निर्मात्यांचे कोट्यवधीचे नुकसान सहन करावे लागले असते.  हीच शक्यता लक्षात घेत ‘पद्मावत’च्या निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता.
तथापि  सर्वोच्च न्यायालयाने ‘पद्मावत’वर मध्यप्रदेश, राजस्थानसह गुजरात व हरियाणा अशा चार राज्यांनी लादलेली बंदी घटनाबाह्य ठरवली होती. शिवाय ‘पद्मावत’वर बंदी लादणाºया राज्यांचे चांगलेच कान टोचले होते. 

Web Title: Deepika Padukone, Loveworld, Ranveer Singh and 'Padmavat' have put their hands in screening!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.