फ्लॉप सिनेमाची कसली पार्टी करतेस ताई? ‘गहराइयां’च्या सक्सेस पार्टीमुळे दीपिका झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 15:29 IST2022-02-21T15:27:27+5:302022-02-21T15:29:57+5:30
Gehraiyaan Success Party: दीपिका पादुकोणचा ‘गहराइयां’ हा सिनेमा दीर्घकाळापासून चर्चेत आहे. काहींना सिनेमा आवडला पण अनेकांनी या चित्रपटाला फ्लॉपच्या यादीत टाकलं. आता अशात दीपिकाने ‘गहराइयां’ने सक्सेस पार्टी एन्जॉय केली म्हटल्यावर काय होणार?

फ्लॉप सिनेमाची कसली पार्टी करतेस ताई? ‘गहराइयां’च्या सक्सेस पार्टीमुळे दीपिका झाली ट्रोल
Gehraiyaan Success Party: दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) ‘गहराइयां’ (Gehraiyaan) हा सिनेमा दीर्घकाळापासून चर्चेत आहे. रिलीजआधी या चित्रपटातील दीपिका व सिद्धांत चतुर्वेदीच्या बोल्ड इंटिमेट सीन्सची चर्चा रंगली. रिलीजनंतर चित्रपट चांगला की वाईट यावरून वेगळी चर्चा ऐकायला मिळाली. काहींना सिनेमा आवडला पण अनेकांनी सुमार म्हणत या चित्रपटाला फ्लॉपच्या यादीत टाकलं. आता अशात दीपिकाने ‘गहराइयां’ने सक्सेस पार्टी एन्जॉय केली म्हटल्यावर काय होणार? दीपिका ट्रोल झाली.
रविवारी रात्री दीपिकाने स्वत: ही सक्सेस पार्टी होस्ट केली. यात ‘गहराइयां’च्या टीमसोबत अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली. यावेळी दीपिका व्हाईट जंपसूटमध्ये दिसली तर अनन्या पांडेने (Ananya Pandey) पिंक कलरचा क्रॉप टॉप व पँटमध्ये या पार्टीला हजेरी लावली.
सिद्धांत चतुर्वेदीही (Siddhant Chaturvedi) रेड कलरची शर्ट आणि रफ ब्लॅक पँट अशा स्टाईलिश लुकमध्ये या पार्टीत सामील झाला. ‘गहराइयां’चे दिग्दर्शक शकुन बत्रा हेही यावेळी दिसले. या सक्सेस पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने या पार्टीचे फोटो शेअर केलेत आणि नेटकर्यांनी दीपिकाला ट्रोल करायला सुरूवात केली.
फ्लॉप सिनेमाची सुद्धा सक्सेस पार्टी देतात का? असा सवाल एका युजरने केला. फ्लॉप सिनेमाची सक्सेस पार्टी होतेय, नेक्स्ट लेव्हल प्रमोशन, अशी खोचक कमेंट एका युजरने केली. कशाची सक्सेस पार्टी ताई? अशा शब्दांत एका युजरने दीपिकाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. फालतू बोल्ड सीन्स दिल्याची पार्टी, म्हणत एका युजरने दीपिकाला ट्रोल केलं.
‘गहराइयां’ या सिनेमाकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा होत्या. पण सिनेमा पाहिल्यानंतर मात्र अनेकांचा भ्रमनिरास झाला होता. यावरचे अनेक मीम्सही व्हायरल झाले होते. अनेकांनी ‘गहराइयां’ची तुलना शकुन बत्राच्या ‘कपूर अॅण्ड सन्स’ या चित्रपटाशी केली होती.