या गायकामुळे दीपिका पादुकोणला मिळाली बॉलिवूडमध्ये एंट्री, तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 13:39 IST2019-12-31T13:35:18+5:302019-12-31T13:39:50+5:30

इंडियन आयडलच्या आगामी भागात स्पर्धकांचा जोश वाढवण्यासाठी दीपिका पादुकोण येणार असून तीच ही गोष्ट सगळ्यांना सांगणार आहे.

Deepika Padukone is grateful to Himesh Reshammiya for giving her a break,reveals on Indian Idol Season 11 | या गायकामुळे दीपिका पादुकोणला मिळाली बॉलिवूडमध्ये एंट्री, तिनेच केला खुलासा

या गायकामुळे दीपिका पादुकोणला मिळाली बॉलिवूडमध्ये एंट्री, तिनेच केला खुलासा

ठळक मुद्देदीपिका पादुकोण म्हणाली की, “‘नाम है तेरा तेरा’ हा व्हिडिओ पाहूनच फराह खानने मला शाहरुख खानसोबत ओम शांती ओम या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.” त्यामुळे या अल्बममध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी हिमेश सरांचे नेहमीच आभार मानते.”

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. 

इंडियन आयडलच्या आगामी भागात स्पर्धकांचा जोश वाढवण्यासाठी दीपिका पादुकोण हजेरी लावणार असून ती तिच्या 'छपाक' या बहुचर्चित चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. ती तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासोबतच परीक्षक आणि स्पर्धकांबरोबर मजा मस्ती देखील करणार आहे. 

इंडियन आयडल या कार्यक्रमात हिमेश रेशमियाने दीपिकाचे भरभरून कौतुक केले. तिने घेतलेल्या धाडसी निर्णयांची देखील हिमेशने प्रशंसा केली आणि म्हणाला तिने घेतलेल्या कष्टांमुळेच ती आज एक उत्कृष्ट आणि यशस्वी अभिनेत्री बनली आहे. त्याने सांगितले की, मला बरेच जण म्हणतात की माझ्या ‘नाम है तेरा तेरा’ या व्हिडिओमुळे दीपिकाला इंडस्ट्रीत ब्रेक मिळाला. पण माझ्यामुळे नव्हे तर दीपिका तिच्या कामावरील निष्ठा आणि चिकाटीमुळे सगळ्यांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. त्याने हे देखील सांगितले की, या अल्बमच्या ऑडिशनसाठी बर्‍याच मुली आल्या होत्या पण त्या सर्वांमध्ये दीपिका खूपच इम्प्रेसिव्ह होती आणि म्हणूनच तिला संधी मिळाली.  


 
यावर दीपिका पादुकोण म्हणाली की, “‘नाम है तेरा तेरा’ हा व्हिडिओ पाहूनच फराह खानने मला शाहरुख खानसोबत ओम शांती ओम या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.” त्यामुळे या अल्बममध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी हिमेश सरांचे नेहमीच आभार मानते.”  


 

Web Title: Deepika Padukone is grateful to Himesh Reshammiya for giving her a break,reveals on Indian Idol Season 11