Video : ‘टिशू’ बनला ‘इश्यू’!  दीपिका पादुकोणला गर्दीने घेरले, पर्स हिसकावण्याचा झाला प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 11:12 IST2021-02-26T11:11:22+5:302021-02-26T11:12:29+5:30

व्हिडीओ व्हायरल, दीपिकाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न झाला पाहून सिक्युरिटी गार्डही टेन्शनमध्ये आले...

deepika padukone gets mobbed and someone tried to pull her handbag | Video : ‘टिशू’ बनला ‘इश्यू’!  दीपिका पादुकोणला गर्दीने घेरले, पर्स हिसकावण्याचा झाला प्रयत्न

Video : ‘टिशू’ बनला ‘इश्यू’!  दीपिका पादुकोणला गर्दीने घेरले, पर्स हिसकावण्याचा झाला प्रयत्न

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, लवकरच दीपिका ‘83’ या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय शकुन बत्राच्या एका सिनेमात ती झळकणार आहे.

बॉलिवूडची ‘मस्तानी’ काल रात्री गर्दीत अशी काही फसली की, या गर्दीतून वाट काढता काढता तिला घाम फुटला. होय, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींसाठी गर्दी नवी नाही. अनेकदा क्रेजी फॅन्स आपल्या आवडत्या स्टार्सभोवती गर्दी करतात, त्यांची एक झलक पाहण्यासाठी उतावीळ होतात. पण यावेळी मामला थोडा वेगळा होता. होय, दीपिकाला गर्दीने केवळ घेरलेच नाही तर तिची पर्स हिसकावण्याचाही प्रयत्न झाला.

दीपिका काल रात्री जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी पोहोचली होती. दीपिकाला रेस्टॉरंटबाहेर येताना पाहून फॅन्स, पापाराझी यांच्यासोबत टीशू विकणा-या काही महिला सुद्धा तिथे पोहोचल्या आणि दीपिकाला टीशू खरेदी करण्यासाठी आग्रह करू लागल्या. अगदी मागे पडल्यात. हे पाहून दीपिका काहीशी घाबरली आणि गर्दी भेदून कशीबशी सुटका करून घेत कारकडे जाण्याचा प्रयत्न करू लागली.

याचदरम्यान काही लोकांनी दीपिकाची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. दीपिकाचे सिक्युरिटी गार्ड तिच्यासोबत होते. त्यांनीही गर्दीला आवरण्याचा प्रयत्न केला. पण दीपिकाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न झाला पाहून सिक्युरिटी गार्डही टेन्शनमध्ये आले. दीपिकाने पर्स घट्ट पकडून ठेवल्यामुळे ती हिसकावण्याचा प्रयत्न फसला.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, लवकरच दीपिका ‘83’ या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय शकुन बत्राच्या एका सिनेमात ती झळकणार आहे. या सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नाही. यात तिच्यासोबत अनन्या पांडे व सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहे. शाहरूख खान  व जॉन अब्राहमसोबत ‘पठान’ या सिनेमातही तिची वर्णी लागली आहे. याशिवाय सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ या सिनेमातही तिला प्रेक्षक पाहू शकणार आहेत.

Web Title: deepika padukone gets mobbed and someone tried to pull her handbag