त्यांना दीपिका पादुकोणने दिले चोख उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 16:32 IST2018-01-25T11:02:21+5:302018-01-25T16:32:21+5:30

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या जोडीचा पद्मावती चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. अनेक अडथळे पार करत हा ...

Deepika Padukone gave her best answer | त्यांना दीपिका पादुकोणने दिले चोख उत्तर

त्यांना दीपिका पादुकोणने दिले चोख उत्तर

पिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या जोडीचा पद्मावती चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. अनेक अडथळे पार करत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला करणी सेनेने विरोध केला होता. चित्रपट रिलीज झाल्यानंतर ही चित्रपटाला घेऊन विरोध कायम आहे.  या चित्रपटाबाबत कलाकारांना खूप अपेक्षा आहेत. सततच्या होणाऱ्या विरोधामुळे या चित्रपटाचे प्रमोशन ही पद्मावतच्या कलाकारांनी केले नाही. ‘हिंदुस्तान टाइम्स मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स’ सोहळ्यादरम्यान दीपिकाने राणी पद्मावतीच्या भूमिकेबाबत आपले मत मांडले. करणी सेनेचे नाव घेता दीपिकाने म्हटले आमचे कामच त्यांना चोख उत्तर देईल. दीपिका या वेळी काहीशी भावूक दिसली.मी खूप अडचणींचा सामना केला आहे. मात्र आता फायनली हा चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटाविषयी मिळणाऱ्या प्रतिक्रिया, प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून मी भारावले आहे. मला वाटयं पद्मावतच्या यशाचा उत्सव करण्याची वेळ आली आहे. सर्व मीडियाचे ही दीपिकाने पाठिंबा दिल्या बाबात आभार मानले.     
दीपिकासोबतच शाहिदनेही आपल्या भूमिकेविषयी प्रतिक्रिया दिली. ‘ज्या भूमिकेविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही, किंवा कोणाला त्याविषयी जास्त माहिती नाही अशी भूमिका साकारणे हे माझ्यासाठी एक मोठे आव्हानच होते. पण, ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मला खरच खूप अभिमान वाटतोय. आम्ही आमचे काम केले आहे, आता प्रेक्षकच या चित्रपटाचे भवितव्य ठरवतील’, असे शाहिद म्हणाला.

ALSO RAED :  Padmaavat:राजा रावल रतन सिंग ही भूमिका शाहिद कपूर आधी या अभिनेत्याला ऑफर करण्यात आली होती?जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता

बॉक्स आॅफिसच्या नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने ३डी स्क्रीन्सच्या माध्यमातून जवळपास ४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तर दुसरीकडे सुपर सिनेमा ट्रेड मॅगझिनने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट देशभरात १५०० स्क्रीनवर रिलीज करण्यात आला असून, आतापर्यंत जवळपास ४.४५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

Web Title: Deepika Padukone gave her best answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.