दीपिका पादुकोण आहे ‘फुडी’; म्हणते, ‘हा’ पदार्थ माझा जीव की प्राण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 18:44 IST2019-12-29T18:43:24+5:302019-12-29T18:44:31+5:30

दीपिका पादुकोण हिने तिची आवड नुकतीच एका मुलाखतीत सांगितली आहे. तिला आवडणारा पदार्थ ती अगदी ताव मारून खाते.

Deepika Padukone is 'Foodie'; It says, 'This' substance is my life or soul! | दीपिका पादुकोण आहे ‘फुडी’; म्हणते, ‘हा’ पदार्थ माझा जीव की प्राण!

दीपिका पादुकोण आहे ‘फुडी’; म्हणते, ‘हा’ पदार्थ माझा जीव की प्राण!

आपला आवडता पदार्थ समोर आला की, तोंडाला पाणी सुटते त्यात काही नवल नाही. प्रत्येकाला कुठला ना कुठला पदार्थ आवडतोच. तिखट असो किंवा गोड प्रत्येकाचा एक तरी फेव्हरेट पदार्थ असतोच. आता हेच बघा ना, यात सेलिब्रिटीही मागे नाहीत. दीपिका पादुकोण हिने तिची आवड नुकतीच एका मुलाखतीत सांगितली आहे. तिला आवडणारा पदार्थ ती अगदी ताव मारून खाते. तो म्हणजे वरण-भात. तिच्यासाठी हा पदार्थ म्हणजे अक्षरश: जीव की प्राण आहे. 

दीपिका ‘खवय्या’ असून तिला विविध पदार्थांची चव चाखायाची फार आवड आहे. ‘मी खवय्या आहे असं म्हटल्यावर कोणाचाच त्यावर विश्वास बसत नाही,’ असंही तिने सांगितलं. दीपिका म्हणते,‘मी ‘फूडी’ आहे आणि हे खूप कमी लोकांना माहित आहे. वरण-भात माझा सर्वांत आवडता पदार्थ आहे. शूट संपल्यानंतर घरी आल्यावर निवांतपणे वरण-भातावर ताव मारण्यासारखं दुसरं सुख नाही.’ 

   तिच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, ‘छपाक’ चित्रपटात दीपिका ही अ‍ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका साकारत आहे. १० जानेवारी २०२० रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून ‘राजी’ फेम दिग्दर्शिका मेघना गुलजारने याचं दिग्दर्शक केलं आहे.

Web Title: Deepika Padukone is 'Foodie'; It says, 'This' substance is my life or soul!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.