"आमच्या कुटुंबातच...", 'धुरंधर'च्या सक्सेसवर दीपिका पादुकोणची पहिली प्रतिक्रिया, 'त्या' कृतीने जिंकली मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:40 IST2026-01-05T15:40:03+5:302026-01-05T15:40:45+5:30
'धुरंधर'मध्ये रणीवर सिंग मुख्य भूमिकेत असून त्याने पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेर हमझा अली मदारी ही भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही होत आहे. 'धुरंधर'च्या सक्सेसनंतर दीपिका पादुकोणने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

"आमच्या कुटुंबातच...", 'धुरंधर'च्या सक्सेसवर दीपिका पादुकोणची पहिली प्रतिक्रिया, 'त्या' कृतीने जिंकली मनं
रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' ठाण मांडून बसला आहे. या सिनेमातील गाणी आणि सीन्सही प्रचंड व्हायरल झाले आहेत. 'धुरंधर'मध्ये रणीवर सिंग मुख्य भूमिकेत असून त्याने पाकिस्तानात जाऊन राहिलेल्या भारतीय गुप्तहेर हमझा अली मदारी ही भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही होत आहे. 'धुरंधर'च्या सक्सेसनंतर दीपिका पादुकोणने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
दीपिकाचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दीपिका चाहत्यांना "धुरंधर पाहिला का?" असं विचारताना दिसत आहे. त्यानंतर चाहत्यांच्या गर्दीतून हो असा प्रतिसाद आल्यानंतर दीपिका स्टाइलमध्ये तिचे केस उडवते आणि छान स्माइल देते. त्यानंतर दीपिका म्हणते की "हे सगळं आमच्या कुटुंबातच आहे". दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यांनी कमेंट करत तिला "अभिमान असलेली बायको" असं म्हटलं आहे.
Deepika on Dhurandhar success
byu/Cobrachan inBollyBlindsNGossip
दरम्यान, 'धुरंधर' सिनेमा ५ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमात रणवीर सिंग, आर माधवन, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'धुरंधर'चा दुसरा भाग येत्या १९ मार्चला सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.