Pathaan: चाहत्यांची प्रतीक्षा संपली!, 'पठान'मधील दीपिका पादुकोणचा दमदार फर्स्ट लूक आऊट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 01:13 PM2022-07-25T13:13:32+5:302022-07-25T13:28:43+5:30

Deepika Padukone Look :आज रिलीज झालेल्या मोशन पोस्टरमध्ये एजंटच्या भूमिकेतील दीपिका पादुकोण दमदार लूक समोर आला आहे.

Deepika Padukone first look from Shahrukh khan film Pathaan revealed | Pathaan: चाहत्यांची प्रतीक्षा संपली!, 'पठान'मधील दीपिका पादुकोणचा दमदार फर्स्ट लूक आऊट

Pathaan: चाहत्यांची प्रतीक्षा संपली!, 'पठान'मधील दीपिका पादुकोणचा दमदार फर्स्ट लूक आऊट

googlenewsNext

Deepika Padukone Look: शाहरुख खानच्या 'पठान' मच अवेटेड अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमाची प्रेक्षक घोषणा झाल्यापासून आतुरतेने वाट पहातायेत.. या चित्रपटाचे नाव सोशल मीडियावर ट्रेंडिंग लिस्टमध्ये कायम आहे. चित्रपटाच्या सेटवरून आतापर्यंत अनेक लूक समोर आल्या आहेत. अलीकडेच, दीपिका पादुकोणचा बिकिनीमधील एक फोटो समोर आला होता. आता चित्रपटातील दीपिकाचा  लूक समोर आला आहे.

दीपिका पादुकोण(Deepika Padukone)ने स्वतः तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक मोशन पोस्टर शेअर केले आहे. आज रिलीज झालेल्या मोशन पोस्टरमध्ये दीपिका पादुकोण दमदार लूकमध्ये दिसत आहे. यात दीपिकाच्या डोक्यावर जखम झालेली दिसतेय. तर हातात बंदूक घेतलेली दिसतेय. पठाणमध्ये दीपिका एका एजंटच्या भूमिकेत आहे जी शाहरुख खानसोबत मिशनवर काम करते. एजंटच्या भूमिकेत दीपिका पादुकोणचा लूक खूपच प्रभावी दिसत आहे.

'बॉलिवूड हंगामा'च्या रिपोर्टनुसार, या सिनेमासाठी ती जवळपास १५ कोटी रूपये मानधन घेणार आहे. असे सांगितले जात आहे की, शाहरूख खानचं मानधन बाजूला केलं जर 'पठान' सिनेमाचं बजेट जवळपास २०० कोटी रूपये असेल. असे सांगितले जात आहे की, आदित्य चोप्राला हा अ‍ॅक्शन सिनेमा इंटरनॅशनल लेव्हलचा करायचा आहे. यात दीपिकासोबत शाहरुख खान आणि जॉन अब्राहमची मुख्य भूमिका आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी यशराज फिल्म्सची निर्मिती असलेला पठाण भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये रिलीज होत आहे.

Web Title: Deepika Padukone first look from Shahrukh khan film Pathaan revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.