‘ही’ दिग्गज अभिनेत्री चोरायची हॉटेलमधील शॅम्पूच्या बॉटल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 11:04 IST2019-08-02T10:49:41+5:302019-08-02T11:04:23+5:30

होय, एका खास व्यक्तिसाठी ही अभिनेत्री चोरायची हॉटेलमधील शॅम्पूच्या बॉटल...

deepika padukone best friend reveals actress once stole shampoo bottle from hotel room |  ‘ही’ दिग्गज अभिनेत्री चोरायची हॉटेलमधील शॅम्पूच्या बॉटल! 

 ‘ही’ दिग्गज अभिनेत्री चोरायची हॉटेलमधील शॅम्पूच्या बॉटल! 

ठळक मुद्देदीपिका सध्या ‘छपाक’ या चित्रपटात बिझी आहे.

दीपिका पादुकोण बॉलिवूडची ‘ए’ लिस्टर्स अ‍ॅक्ट्रेस आहे. दीपिकाने अपार मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. पण हीच दीपिका ख-या आयुष्यात कशी आहे? हे जाणून घ्यायला उत्सूक असणा-या चाहत्यांना दीपिकाची बेस्ट फ्रेन्ड स्रेहा रामचंदर हिने एक मोठे सरप्राईज दिले आहे. होय, फ्रेन्डशिप डे आधी स्रेहाने दीपिकाबद्दलच्या काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. त्या वाचून एक वेगळी दीपिका तुम्हाला भेटले.


स्नेहाने दीपिकाच्या वेबसाईटवर ही नोट शेअर केली आहे. ‘दीपिका अशी एक व्यक्ति आहे, जिच्यासोबत मी तासन् तास गप्पा मारू शकते. तिच्या डोळ्यांत केवळ प्रेम दिसते. यावरून ती तुम्हाला किती जपते, हे कळते. ती माझ्यासाठी हॉटेलमधील शॅम्पूच्या छोट्या छोट्या बॉटल चोरायची. ती जेव्हाकेव्हा फिरायला जायची, तेव्हा तेव्हा असे करायची. कारण मला या बॉटल आवडतात, हे तिला ठाऊक होते. दीपिकावर मी जीवापाड प्रेम करते. मी नशीबवान आहे की, तू माझ्यासोबत आहेस, असे स्रेहाने लिहिले आहे. 


दीपिकाच्या वेबसाईटवर दर महिन्याला तिची एक जवळची व्यक्ति तिच्याबद्दल काहीतरी लिहिते. यापूर्वी दिग्दर्शक इम्तियाज अलीने दीपिकाबद्दल एक पोस्ट लिहिली होती. ‘त्यादिवशी तिने माझ्याकडे पाहिले. मी पाहताक्षणीच तिला ओळखले. तिच्या डोळ्यांनीही हाच तो दिग्दर्शक, हे ओळखले होते. जणू ती सगळे जाणते, हे तिच्या बोलक्या डोळ्यांत दिसत होते. मी दीपिकाला भेटायला गेलो, तोपर्यंत तिचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नव्हता. मी ‘रॉकस्टार’साठी तिला घेऊ इच्छित होतो. पण हा चित्रपट अनेक वर्ष रखडला. त्यामुळे एका दुसºया चित्रपटात मी तिला घेतले,’असे इम्तियाज अलीने लिहिले होते.


दीपिका सध्या ‘छपाक’ या चित्रपटात बिझी आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: deepika padukone best friend reveals actress once stole shampoo bottle from hotel room