दीपिका पादुकोणने रचला इतिहास, मेटा AI Assistant ला आवाज देणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी बनली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:33 IST2025-10-16T12:31:09+5:302025-10-16T12:33:19+5:30
Deepika Padukone AI Assistant Voice: दीपिका पादुकोण ही मेटा एआयला आवाज देणारी पहिली भारतीय ठरली आहे.

दीपिका पादुकोणने रचला इतिहास, मेटा AI Assistant ला आवाज देणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी बनली!
Deepika Padukone AI Assistant Voice: बॉलिवूडची 'डिंपल क्वीन' अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने आपल्या नावावर आणखी एक मोठा जागतिक विक्रम केला आहे. जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी कंपनी मेटा (Meta) च्या 'मेटा एआय' (Meta AI) व्हर्च्युअल असिस्टंटला आवाज देणारी ती पहिली भारतीय सेलिब्रिटी ठरली आहे.
एआय असिस्टंटला आता दीपिकाच्या आवाजात ऐकण्याची संधी भारतीय युजर्सना मिळणार आहे. ज्यात रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेसचा समावेश आहे. व्हिडीओ शेअर करत मेटाने अधिकृतपणे घोषणा केली आहे की, भारतातील युजर्स आता भारतीय इंग्रजीमध्ये (Indian English) दीपिकाच्या आवाजात मेटा एआयशी बोलू शकतील. फक्त भारतातीलच नाही तर अमेरिका, कॅनडा, यूके, ऑस्ट्रेलिया व न्युझीलंडमधील एआय असिस्टंटचा वापर करणारे लाखो लोक दीपिकाच्या आवाजात एआयकडून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतील. तंत्रज्ञानाच्या या माध्यमातून दीपिका कायम चाहत्यांशी जोडलेली राहणार आहे.
दीपिका ही एआय असिस्टंटला आवाज देणाऱ्या जागतिक सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाली आहे. या यादीत हॉलिवूड स्टार अवक्वाफिना आणि जुडी डेंच यांच्या नावांचा समावेश आहे. दीपिकासाठी, हे पाऊल तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, दीपिका पादुकोणकडे सध्या बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा 'किंग' हा चित्रपट आहे. दीपिका पादुकोणने या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण व्यतिरिक्त अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. 'किंग' व्यतिरिक्त दीपिका पादुकोणकडे अल्लू अर्जुन आणि ॲटली कुमार यांचा एक बिग बजेट चित्रपट देखील आहे.