दीपिका पादुकोणच्या बॅगची किंमत ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 12:52 IST2020-01-04T12:51:21+5:302020-01-04T12:52:04+5:30

दीपिकाच्या हातातील ब्राऊन रंगाच्या बॅगेची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क

Deepika Padukone bag cost is too much | दीपिका पादुकोणच्या बॅगची किंमत ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

दीपिका पादुकोणच्या बॅगची किंमत ऐकून तुमचे डोळे होतील पांढरे

बॉलिवूडची मस्तानी गर्ल अभिनेत्री दीपिका पादुकोण हिची प्रत्येक अदा ही घायाळ करणारी असते. ती कायम तिच्या वेगवेगळया फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत असते. आता हेच बघा ना, काही दिवसांपूर्वी तिला बंगळुरू एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. तिचे  एअरपोर्टवरील फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. पण, त्यावेळी तिच्या हातात असलेल्या ब्राऊन रंगाच्या बॅगेची किंमत ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 


काही दिवसांपूर्वी दीपिकाला बंगळुरू एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी ती कॅज्युअल लुकमध्ये दिसली. यावेळी तिनं व्हाइट स्वेट शर्ट आणि ट्राऊझर घातली होती. यासोबतच तिनं ब्लॅक सनग्लासेस आणि ब्राउन शूज कॅरी केले होते. मात्र या सगळ्यात दीपिकाच्या बॅगनं सर्वांचं लक्ष वेधलं. एअरपोर्ट लुक कम्प्लिट करण्यासाठी दीपिकानं शूजला मॅचिंग बॅग घेतली होती. या ब्राउन बॅगची चर्चा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खास करून या बॅगच्या किंमतीचीच चर्चा सर्वत्र होत आहे.


एअरपोर्टवर दीपिकानं कॅरी केलेली ही बॅग लुई वितों (Louis Vuitton carryall bag coated with canvas and VVN)ची ट्रॅव्हलर बॅग होती. ज्याची किंमत जवळपास १ लाख २२ हजार ८६० रुपये असल्याचं बोललं जात आहे. या आधीही अनेक अभिनेत्री अशाच महागड्या बॅग कॅरी करताना दिसल्या आहेत. ही बॅग दीपिकाचा लुक कम्प्लिट करत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सध्या दीपिकाच्या या बॅगचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

दीपिकाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर तिचा बहुचर्चित चित्रपट छपाक १० जानेवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. यात दीपिका अ‍ॅसिड हल्ला पीडीता लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारताना दिसणार आहे.

याशिवाय ८३ या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट टीमने मिळवलेल्या विश्वचषक विजयावर आधारित आहे.

यात रणवीर कपिल देव तर दीपिका कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारणार आहे. 

Web Title: Deepika Padukone bag cost is too much