​ स्वरा भास्करच्या खुल्या पत्रावर दीपिका पादुकोणने दिले असे उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 14:08 IST2018-02-01T08:38:00+5:302018-02-01T14:08:00+5:30

‘पद्मावत’चा एक अध्याय गाजला आणि स्वरा भास्कर नावाचा दुसरा अध्याय गाजतो आहे. होय, एकीकडे या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडत ...

Deepika Padukone answered on Swara Bhaskar's open letter! | ​ स्वरा भास्करच्या खुल्या पत्रावर दीपिका पादुकोणने दिले असे उत्तर!

​ स्वरा भास्करच्या खुल्या पत्रावर दीपिका पादुकोणने दिले असे उत्तर!

द्मावत’चा एक अध्याय गाजला आणि स्वरा भास्कर नावाचा दुसरा अध्याय गाजतो आहे. होय, एकीकडे या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडत असताना दुसरीकडे अभिनेत्री स्वरा भास्कर हिने ‘पद्मावत’वर वेगळीच भूमिका मांडली आहे. या चित्रपटात सती प्रथेचे उदात्तीकरण करण्याचा आल्याचा दावा करत, स्वराने भन्साळींच्या नावे खुले पत्र लिहिले होते. ‘पद्मावत’मध्ये ‘जौहर’ दाखवून तुम्हाला काय संदेश द्यायचाय?२१ व्या शतकातही महिलांच्या अब्रुभोवतीच गोष्टी का फिरतात? विधवा, बलात्कारपीडित महिलांना जगण्याचा अधिकार नाही का? असा सवाल स्वराने भन्साळींना उद्देशून केला होता. अद्याप भन्साळींनी स्वरांच्या या प्रश्नांना उत्तर दिलेले नाही. पण  रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्या पाठोपाठ ‘पद्मावत’ची लीड अ‍ॅक्ट्रेस दीपिका पादुकोण हिने मात्र स्वराला डिवचणारे  उत्तर दिले आहे. अलीकडे एका मुलाखतीत दीपिकाला स्वराच्या या खुल्या पत्राबद्दल विचारले गेले.  यावर दीपिका एखादे ‘डिप्लोमॅटिक’ उत्तर देईल, असे वाटत असताना झाले भलतेच. स्वराला चांगलेच बोचेल असे काही दीपिकाने म्हटले. ‘कदाचित स्वराने चित्रपटापूर्वी दाखवलेला डिसक्लेमर मिस केला असावा. कदाचित डिसक्लेमर दाखवला त्यावेळी स्वरा पॉपकॉर्न आणायला गेली असावी,’ असे दीपिका म्हणाली. आता दीपिकाच्या या प्रश्नावर स्वरा कशी रिअ‍ॅक्ट होते, ते बघूच.

ALSO READ : स्वरा भास्करने म्हटले, ‘माफी मागा, अन्यथा कोर्टात खेचणार’, वाचा काय आहे प्रकरण!

याआधी स्वराच्या पत्रावर ‘खिल्जी’ रणवीरने एकदम कूल अंदाजात रिअ‍ॅक्ट केले होते. ‘मला बाकी तर माहित नाही. पण स्वराने मला मॅसेज करून चित्रपटातील माझ्या अभिनयाची प्रचंड तारीफ केली होती. त्यामुळे मी आनंदी आहे,’ असे रणवीर म्हणाला होता. याऊलट शाहिद  कपूरने हे स्वराचे वैयक्तिक मत आहे, असे सांगून यावर बोलणे टाळले होते.

Web Title: Deepika Padukone answered on Swara Bhaskar's open letter!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.