'हा' आहे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग #valentine day प्लॉन !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 08:32 AM2018-02-10T08:32:12+5:302018-02-10T14:02:40+5:30

सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू असल्यानंतर सगळीकडे व्हॅलेंटाईन डेचे वारे वाहत आहेत. याला बॉलिवूड कलाकारही अपवाद नाही. इंडस्ट्रीत ही अनेक ...

'This' is Deepika Padukone and Ranveer Singh #valentine day plan! | 'हा' आहे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग #valentine day प्लॉन !

'हा' आहे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग #valentine day प्लॉन !

googlenewsNext
्या व्हॅलेंटाईन वीक सुरू असल्यानंतर सगळीकडे व्हॅलेंटाईन डेचे वारे वाहत आहेत. याला बॉलिवूड कलाकारही अपवाद नाही. इंडस्ट्रीत ही अनेक कपल्सचे एकमेकांवर नितांत प्रेम आहे. यातलचे एक कपल आहे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण. दोघांचे फॅन्सही हे जाणून घेण्याबाबत उत्सुक आहेत की दोघे व्हॅलेंटाईन डे कसा सेलिब्रेट करणार आहेत ते. आम्ही तुम्हाला सांगतो या दोघांचा काय प्लॉन आहे ते.  

नुकतेच दीपिकाला विचारण्यात आले  तू व्हॅलेंटाईन डेला काय करणार आहेस? त्यावर तिने लगेच उत्तर दिले की  आम्ही सगळे दिवस म्हणजेच चॉकलेट डे व्हॅलेंटाइन डे साजरे करणार आहोत आणि मी व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी माझ्या येणाऱ्या चित्रपटाच्या तयारीत बिझी असणार आहे. 

हाच प्रश्न काही दिवसांपूर्वी रणवीरला विचारला गेला तेव्हा तो म्हणाला की, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी मी चित्रपटाचे शूटिंग करत असणार आहे. रणवीर सिंग पद्मावतनंतर सध्या जोया अख्तरच्या "गली बॉय" च्या शूटिंगला व्यस्त झाला आहे. 

पद्मावतनंतर दीपिका विशाल भारद्वाज दिग्दर्शित "सपना दीदी"मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 'हुसेन जैदी' चे पुस्तक 'माफिया क्विन्स ऑफ मुंबई" ह्या वर आधारित आहे. ह्यात दीपिका बरोबर इरफान खान सुद्धा आहे. ह्याधी ते पिकू चित्रपटात एकत्र दिसले होते. 

ALSO READ :  ​तर काय रणवीर सिंग व दीपिका पादुकोणही निवडणार ‘विरूष्का’सारखा ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा पर्याय?'

काही दिवसांपासून दीपिका आणि रणवीर लवकरच लग्न करणार आहेत अशी चर्चा होती. विराट कोहली व अनुष्का शर्मासारखेच हे दोघेही डेस्टिनेशन वेडिंग करण्याच्या विचारात आहेत. डेस्टिनेशन वेडिंगची सध्या जोरात चर्चा आहे. पण रणवीर व दीपिका दोघांनाही समुद्र किनारा खूप आवडतो.  सूत्रांच्या मते, लग्नानंतर दोन रिसेप्शन होतील. दीपिकाचे कुटुंब बेंगळुरूत राहते. त्यामुळे दीपिकाच्या नातेवाईकांसाठी एक रिसेप्शन बेंगळुरूत होईल.

Web Title: 'This' is Deepika Padukone and Ranveer Singh #valentine day plan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.