सोनम कपूरनंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचा मुहुर्त ठरला !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 15:53 IST2018-05-03T10:23:55+5:302018-05-03T15:53:55+5:30
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा 8 मे रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या गोष्टीला दोघांच्या कुटुंबीयांदेखील दुजोरा ...
(1).jpg)
सोनम कपूरनंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचा मुहुर्त ठरला !
ब लिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा 8 मे रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या गोष्टीला दोघांच्या कुटुंबीयांदेखील दुजोरा दिला आहे. सोनम आणि आनंदच्या लग्नाची तारीख ठरल्यानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची तारीख सुद्धा नक्की झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार दीपिका आणि रणवीरचे लग्नाची तारीख नोव्हेंबर महिन्यातली काढण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघांच्या सहमतीने या महिन्यातील तारीख नक्की करण्यात आली आहे.
डीएनएच्या रिपोर्टनुसार रणवीर आणि दीपिकाच्या कुटुंबीयांनी लग्नाची तारीख नक्की करण्यासाठी एक मीटिंगदेखील केली. यात जास्त मुहुर्त नोव्हेंबर महिन्यातलेच आहेत. ज्यानंतर दोनही कुटुंबीयांना लग्नासाठी हाच महिना योग असल्याचे ठरवले आहे. लग्नाच्या तयारीत कसू भरही कसल्याच गोष्टीची कमी पडू नये यासाठी दीपिकाच्या टीममधील प्रत्येकाला नोव्हेंबरमध्ये एकही सुट्टी घ्यायची नाही अशी ताकिद देण्यात आली आहे. दीपिकाच्या मेकअप आर्टिस्ट पासून ते मॅनेजरपर्यंत सगळ्यांना लग्ना दरम्यान हजर राहण्याचे आदेश आहेत. अजून दीपिकाच्या पीआर टीमकडून याबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लग्नाची तारीख नोव्हेंबरमध्येच ठरली आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका आपल्या आईसोबत दागिण्यांची खरेदी करताना दिसली होती.
मुंबई मिररच्या रिपोर्ट बंगळुरु आणि मुंबईतल्या घरी लग्नाची तयारी सुरु झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका व रणवीर या दोघांनाही डेस्टिनेशन वेडिंग हवे आहे. पण त्यांच्या कुटुंबाना मात्र हे मान्य नाही. त्यामुळे हे लग्न मुंबईतचं होण्याची शक्यता अधिक आहे. रणवीर व दीपिका दोघांनाही समुद्र किनारा खूप आवडतो. त्यामुळे लग्नासाठी बीच वेडिंगचा पर्याय निवडला जाण्याची दाट शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे.
ALSO READ : जेव्हा विदेशी पत्रकाराने म्हटले, ‘नमस्कार दीपिकाजी’ तेव्हा दीपिका पादुकोणने दिले ‘हे’ उत्तर!