बाजीराव-मस्तानी चित्रपटाला 8 वर्षे पूर्ण; दीपिका आणि रणवीर नाही तर 'या'जोडीला होती पहिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 07:39 PM2023-12-18T19:39:21+5:302023-12-18T19:43:08+5:30

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाला आज आठ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Deepika and Ranveer Film Bajirao Mastani Completes 8 Years, Know Interesting Facts | बाजीराव-मस्तानी चित्रपटाला 8 वर्षे पूर्ण; दीपिका आणि रणवीर नाही तर 'या'जोडीला होती पहिली पसंती

बाजीराव-मस्तानी चित्रपटाला 8 वर्षे पूर्ण; दीपिका आणि रणवीर नाही तर 'या'जोडीला होती पहिली पसंती

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाला आज आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. 18 डिसेंबर 2015 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. पण, तुम्हाला माहिती आहे का या चित्रपटासाठी रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा हे संजय लीला भन्साळी यांची पहिली पसंती नव्हते. 

संजय लीला भन्साळी यांना 1996 मध्ये बाजीराव-मस्तानी बनवायचा होता. परंतु दुर्दैवाने दोन वेळा पुढे ढकलण्यात आला. अखेर 2015 मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला होता.  सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांना बाजीराव आणि मस्तानीच्या भूमिकेसाठी भन्साळी यांनी पसंत केले होते. पण, चित्रपटाची घोषणा होईपर्यंत सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झालं. त्यानंतर  इच्छा नसतानाही भन्साळी यांना आपला निर्णय बदलावा लागला होता.

ऐश्वर्याऐवजी संजय लीला भन्साळी यांनी करीना कपूरला मस्तानीची आणि राणी मुखर्जीला पेशवा बाजीरावांच्या पत्नी काशीबाईची भूमिका ऑफर केली होती.  पण, अडचण निर्माण झाली आणि कास्टिंगच्या समस्येमुळे संजय लीला भन्साळींनी पुन्हा एकदा चित्रपट थांबवला. 2014 मध्ये जेव्हा तिसऱ्यांदा चित्रपट सुरू झाला तेव्हा अजय देवगण आणि दीपिका पदुकोण यांना चित्रपटात मुख्य भूमिका देण्यात आल्या होत्या. पण, अजयने चित्रपट सोडला. यानंतर सुशांत सिंग राजपूतला चित्रपटाची ऑफर देण्यात आली. 

सुशांत हा इतर चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने त्यानेही चित्रपटात काम करण्यास नकार दिला. अखेर सुशांतनंतर रणवीर सिंगला या चित्रपटात कास्ट करण्यात आले आणि प्रियांका चोप्राला काशीबाईची तर दीपिकाला मस्तानीची भुमिका मिळाली. 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले. शिवाय, बाजीराव-मस्तानी हा 36वा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला. 

Web Title: Deepika and Ranveer Film Bajirao Mastani Completes 8 Years, Know Interesting Facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.