सैफ अली खान व करीना कपूर यांनी दुसऱ्या बाळाबद्दल घेतला हा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 16:48 IST2018-09-11T16:46:41+5:302018-09-11T16:48:37+5:30

काही दिवसांपूर्वी करीनाने खास मैत्रीण अमृता अरोरासोबत एका चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी करीनाने आपल्या दुसऱ्या बाळाच्या प्लानिंगबद्दल काही गोष्टी शेअर केल्या.

This decision was taken by Saif Ali Khan and Kareena Kapoor for the second child | सैफ अली खान व करीना कपूर यांनी दुसऱ्या बाळाबद्दल घेतला हा मोठा निर्णय

सैफ अली खान व करीना कपूर यांनी दुसऱ्या बाळाबद्दल घेतला हा मोठा निर्णय

ठळक मुद्देतैमूरसाठी करीना दोन वर्षे बॉलिवूडपासून होती दूर


अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने नुकतेच दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. यावेळी त्यांना मुलगा झाला आहे. या आनंदाच्या बातमीनंतर आता आणखीन एक गोड बातमी समजते आहे. काही दिवसांपूर्वी करीनाने खास मैत्रीण अमृता अरोरासोबत एका चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी करीनाने आपल्या दुसऱ्या बाळाच्या प्लानिंगबद्दल काही गोष्टी शेअर केल्या. यावेळी ती म्हणाली की, सैफ आणि मी दुसऱ्या बाळाचे नियोजन करत आहोत. मात्र हे सर्व दोन वर्षानंतर होणार आहे. 

करीनाचे दुसऱ्या बाळाचे प्लानिंग एेकल्यानंतर अमृता म्हणाली की, मी करीनाला आधीच सांगून ठेवले आहे की तू जेव्हा दुसऱ्यांदा गरोदर राहण्याचा निर्णय घेशील तेव्हा सर्वात आधी मला सांग. कारण हा देश सोडून मी जाईन.
करीना व सैफ यांचा मुलगा तैमूर आता खूप लहान आहे. मात्र तो खूप लोकप्रिय आहे. त्याचा चाहतावर्ग असून त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी ते खूप उत्सुक असतात. तसेच तैमूरदेखील कॅमेऱ्यासमोर अजिबात घाबरत नाही. उलट तो स्माइल देतो. सैफ करीना तैमूरला जास्त अटेंशन मिळत असल्यामुळे थोडे त्रस्त आहेत. याबाबत करीनाने सांगितले की, मला वाटते की तैमूरला गरजेपेक्षा जास्त अटेंशन मिळत आहे. तैमूरदेखील इतर लहान मुलासारखे साधारण मोठा व्हावा, असे आम्हाला वाटते.

तैमूरसाठी करीना कपूर दोन वर्षे बॉलिवूडपासून दूर होती. दोन वर्षानंतर करीनाने वीरे दी वेडिंगमधून पुनरागमन केले. यातील तिने साकारलेली वीरेची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली. आता ती गुड न्यूज व करण जोहरच्या तख्त चित्रपटात दिसणार आहे.
 

Web Title: This decision was taken by Saif Ali Khan and Kareena Kapoor for the second child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.