Video: गुरमीतनं घेतलं नवीन घर, पत्नी देबिनासोबत केला गृहप्रवेश! पाहा नवीन घराची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 13:40 IST2025-05-30T13:34:41+5:302025-05-30T13:40:18+5:30
देबिना आणि गुरमीतचं मोठं स्वप्न पुर्ण झालंय.

Video: गुरमीतनं घेतलं नवीन घर, पत्नी देबिनासोबत केला गृहप्रवेश! पाहा नवीन घराची झलक
Debina Bonnerjee Gurmeet Choudhary New House: देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) हे दोघे टेलिव्हीजनवरील रोमँटिक कपलपैकी एक आहेत. हे कपल सध्या प्रचंड चर्चेत आहे. यामागचं कारणही तेवढंच खास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःचं घर बांधण्याचं दोघांनी स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. नुकतंच या जोडीनं आपल्या नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.
देबिना आणि गुरमीतनं आपल्या नव्या घराची झलक सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे शेअर केली आहे. व्हिडीओमध्ये देबिना कलश डोक्यावर घेऊन आपल्या मोठ्या मुलीसह घरात प्रवेश करताना दिसतेय. तर गुरमीतनं दुसऱ्या मुलीसह घरात प्रवेश घेताना दिसतोय. यावेळी देबिना गुरमीतन आणि त्यांच्या दोन्ही मुली गोड दिसत होत्या.
देबिनाने या व्हिडीओसोबत एक लांबलचक कॅप्शन दिलं. तिने लिहिले, "वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाले. मी हे स्वप्न खूप वर्षांपासून पाहत होते, जे आज पूर्ण झाले आहे. देवाने माझ्या सर्व प्रार्थना ऐकल्या. मी डायरीत किती गोष्टी लिहिल्या होत्या, त्या आता पूर्ण झाल्या आहेत", असं तिनं म्हटलं.
'रामायण'ने घडवली लव्ह-स्टोरी
देबिना आणि गुरमीतने २००८ मध्ये टीव्ही मालिका 'रामायण' मध्ये दोघांनी एकत्र काम केले. राम आणि सीतेच्या भूमिकेतील गुरमीत आणि देबिना सेटवरच एकमेकांच्या अधिक जवळ येऊ लागले आणि त्यांच्या लव्ह स्टोरीची सुरूवात झाली. यानंतर गुरमीतने देबिनाला ‘पती पत्नी और वो’ मालिकेच्या सेटवर प्रपोज केलं होतं. त्यानंतर १५ फेब्रुवारी, २००९ मध्ये या दोघांनी गुपचूप मंदिरात लग्न केले. केवळ अगदी जवळचे मित्र या लग्नात उपस्थित होतो. साधारण २ वर्ष आपले लग्न आपल्या कुटुंबापासूनही या दोघांनी लपवून ठेवले होतं. त्यानंतर जेव्हा घरी माहिती झालं तेव्हा दोघांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत संपूर्ण रितीरिवाजासह २०११ मध्ये पुन्हा लग्न केलं होतं. लग्नानंतर १० वर्षांनी देबिनाने लागोपाठ २ मुलींना जन्म दिला.