DEATH RUMOURS: फरीदा जलाल यांच्या मृत्यूची अफवा; आणखी एका सेलिब्रेटीला मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 10:37 IST2017-02-20T05:03:15+5:302017-02-20T10:37:54+5:30
बॉलीवूड सेलिब्रेटींच्या खोट्या निधन वार्ता येण्याचे प्रमाण अलिकडे खूप वाढले आहे. मध्यंतरी अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, यो यो हनी ...

DEATH RUMOURS: फरीदा जलाल यांच्या मृत्यूची अफवा; आणखी एका सेलिब्रेटीला मनस्ताप
ब लीवूड सेलिब्रेटींच्या खोट्या निधन वार्ता येण्याचे प्रमाण अलिकडे खूप वाढले आहे. मध्यंतरी अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, यो यो हनी सिंग यांच्या मृत्यूच्या अफवा आल्या होत्या. आपल्या आवडत्या कलाकारांविषयी अशी माहिती कळताच अनेक लोक शहानिशा न करता सोशल मीडियावर ती पसरवितात आणि अफवा वाणव्यासारखी सगळीकडे झपाट्याने पसरते.
त्याचा अनुभव आणखी एका बॉलीवूड सेलिब्रेटीला आला. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ आणि ‘कुछ कुछ होता है’मध्ये आईची भूमिका केलेल्या फरीदा जलाल यांची काल रात्री मृत्यूची बातमी सोशल मीडियावर फिरत होती. कोणी तरी त्यांचे निधन झाल्याची श्रद्धांजली पोस्ट इंटरनेवटर टाकली आणि मग सुरू झाला ‘आरआयपी’ पोस्ट्सचा वर्षाव.
त्यांच्या ‘शरारत’ मालिकेचा दुसरा भाग येण्याची बातमी नुकतीच आली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसणे स्वाभाविक होते. फरीदा यांनी स्वत: ट्विट करून आपण सुखरुप आणि निरोग असल्याचे सांगितले आणि अफवांना पूर्णविराम लावण्याची विनंती केली. तसेच अशा खोट्या बातम्या पसरविणाऱ्यांचा चांगलाच समाचारही घेतला.
► ALSO READ: दिलीप प्रभावळकरांनंतर आता शिवाजी साटम गेल्याची अफवा
त्या म्हणाल्या की, ‘मला नाही माहिती कोणी का कोणाच्या मृत्यूची अफवा पसरवते. सुरूवातीला मला ही सगळी गंमत वाटली मात्र मग जो काही लोकांच्या फोन्सचा तडाखा सुरू झाला आणि सगळे जण एकच प्रश्न विचारायचे ‘तु जिवंत आहेस ना?’ तेव्हा मात्र प्रकरण हाताबाहेर गेल्याचे मला लक्षात आले. कृपा करून अशा खोट्या बातम्या पसरविणे बंद करा. याचा आमच्या कुटुंबियांवर काय परिणाम होत असे याचा विचार करा.’
मूळच्या दिल्लीच्या फरीदा यांचा पुढील महिन्यात १४ तारखेला ६८ वा वाढदिवस आहे. इम्रान खानचा आगामी चित्रपट ‘सरगोशिया’ चित्रपटात त्या दिसणार आहेत. दोनशेपेक्षा जास्त हिंदी सिनेमांत त्यांनी काम केलेले असून तमिळ, तेलुगू आणि इंग्रजी चित्रपटांतही त्या झळकलेल्या आहेत. पारस (१९७१), हीना (१९९१) आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’(१९९५) या सिनेमांतील भूमिकांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री म्हणून तीन फिल्मफेयर पुरस्कार मिळालेले आहेत.
मध्यंतरी मराठी अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचे निधन झाल्याची बातमी पसरली होती. त्यानंतर शिवाजी साटम यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे संदेश फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर फिरू लागले होते. तिकडे हॉलीवूडमध्येही सेलिब्रेटींविषयी अशा अफवा येत असतात. अर्नोल्ड श्वार्झनेगर आणि ब्रिटनी स्पिअर्स यांचे निधन झाल्याचे ट्विट बरेच गाजले होते.
► ALSO READ: ब्रिटनी स्पीअर्सच्या मृत्यूचे ट्विट झाले व्हायरल