​रणवीर सिंगचा अफलातून ‘डीडीएलजे’ क्लायमेक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 21:05 IST2017-02-07T15:26:28+5:302017-02-07T21:05:16+5:30

बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंग आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईल स्टेटमेंट व अफलातून वागण्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळवित असतो. रणवीर ...

'DDLJ' Climax by Ranveer Singh | ​रणवीर सिंगचा अफलातून ‘डीडीएलजे’ क्लायमेक्स

​रणवीर सिंगचा अफलातून ‘डीडीएलजे’ क्लायमेक्स

लिवूडचा बाजीराव रणवीर सिंग आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईल स्टेटमेंट व अफलातून वागण्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळवित असतो. रणवीर सिंगने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला एक फनी व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने १९९५ साली प्रदर्शित झालेला दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे या चित्रपटातील क्लायमेक्स रिक्रियेट केला आहे. 

शाहरुख खान, काजोल यांच्या प्रमुख भूमिका असलेला दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे हा चित्रपट आदित्य चोप्राने दिग्दर्शित केला होता. सुपर-डुपर हिट ठरलेला हा चित्रपट आजही मुंबईच्या मराठा मंदिरात दाखविला जात आहे. या चित्रपटातील क्लायमेक्स आजही सर्वांना आवडतो. या क्लायमेक्सवर आधारित अनेक जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे हा आॅल टाईम फेव्हरेट क्लायमेक्स ठरला आहे. यासोबतच दिलवाले दुल्हनीया या चित्रपटाची कल्ट क्लासिक म्हणून गणना केली जाते. अनेकदा फनी मुव्हमेंट म्हणून डीडीएलजेमधील प्रसंग रिक्रियेट करण्यात आले आहेत. 



असाच प्रयोग रणवीर सिंगने केला आहे. यासाठी त्याने कोरिओग्राफर गणेश हेगडेची मदत घेतली आहे. दोघांनी मिळून डीडीएलजेचा क्लायमेक्स आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. रणवीरने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहले ‘हा सिन प्रशिक्षित चित्रपट कलावंतानी केला आहे, याला घरी किंवा रेल्वेस्टेशनवर करण्याचा प्रयत्न करू नका’. रणवीरने शेअर केलेला व्हिडीओ पाहून हसायला येते. कारण यात शाहरुखच्या रुपात रणवीर सिंग तर काजोलच्या रुपात गणेश हेगडे दिसतो आहे. गणेशला आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न करणारा रणवीर रेल्वेतून खाली पडतो. तुम्ही देखील एकादा हा व्हिडीओ पाहाच....

https://www.instagram.com/p/BQNBxHlAlIE/?taken-by=ranveersingh