"तो काय माझा भाऊ...", आमिरकडे काम का मागत नाही? विचारल्यावर दर्शिल सफारीचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:49 IST2025-06-23T13:49:10+5:302025-06-23T13:49:46+5:30

आमिरकडे काम का मागत नाही अशी त्याला अनेकदा विचारणा होते. नुकतंच एका मुलाखतीत त्याने यावर काय उत्तर दिलंय वाचा.

darsheel safary talks about why he dosent ask work from aamir khan after taare zameen par | "तो काय माझा भाऊ...", आमिरकडे काम का मागत नाही? विचारल्यावर दर्शिल सफारीचं उत्तर

"तो काय माझा भाऊ...", आमिरकडे काम का मागत नाही? विचारल्यावर दर्शिल सफारीचं उत्तर

आमिर खानचा (Aamir Khan) २००७ साली आलेला 'तारे जमीन पर' सिनेमा आजही पाहिला तरी रडू येतंच. 'डिस्लेक्सिया' आजार असलेल्या मुलाची आणि त्याच्या शिक्षकाची ही गोष्ट भावुक करणारीच आहे. यानंतर आता आमिरचा 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par)सिनेमा आला आहे. दिव्यांग मुलांच्या बास्केटबॉल कोचची त्याने भूमिका साकारली आहे. हाही सिनेमा रडवणारा आणि खूप हसवणाराही आहे. 'तारे जमीन पर' अभिनेता दर्शिल सफारीने (Darsheel Safary) ईशान अवस्थीची भूमिका साकारली होती. यानंतर तो फार कमी सिनेमांमध्ये दिसला. आमिरकडे काम का मागत नाही अशी त्याला अनेकदा विचारणा होते. नुकतंच एका मुलाखतीत त्याने यावर काय उत्तर दिलंय वाचा.

'तारे जमीन पर'मध्ये दर्शिल सफारीने साकारलेली ८ वर्षांच्या ईशान अवस्थीची भूमिका सर्वांच्या लक्षात आहे. दर्शिलचा आजही आमिरसोबत छान बॉन्ड आहे. मात्र तो नंतर कधीच आमिरसोबत काम करताना दिसला नाही. यावर नुकतंच 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "मी कोरोनानंतर जे जे काम केलं आहे ते माझे कॉन्टॅक्ट्स वापरुन केलं आहे. ऑडिशन आणि स्क्रीन टेस्ट देऊन मला काम मिळालं आहे. यामुळे मलाही मी कोणत्या भूमिकेसाठी सक्षम आहे हे कळालं. तसंच दिग्दर्शक-निर्मात्यांनाही मी कोणत्या भूमिकेत फिट बसतो हे समजण्यासाठी मदत झाली."

तो पुढे म्हणाला, "मी आमिरकडे काम का मागत नाही असं अनेकजण मला विचारतात. पण असं करायला मला लाज वाटते. तो काही माझा भाऊ नाहीए की मी त्याला फोन करेन. 'प्लीज मला स्क्रीप्ट मिळवून दे' असं मी त्याला कधी म्हणणार नाही. मी फक्त त्याला वाढदिवसाला शुभेच्छाचा मेसेज करतो. मला एवढंच करणं योग्य वाटतं."

Web Title: darsheel safary talks about why he dosent ask work from aamir khan after taare zameen par