​‘दंगल’ झाला रिलीज, आता Boycottची तयारी! जाणून घ्या कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 16:07 IST2016-12-23T16:07:00+5:302016-12-23T16:07:00+5:30

आमिर खान याचा बहुप्रतिक्षीत ‘दंगल’ हा सिनेमा आज  चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि लगेच ‘दंगल’वर बहिष्कार टाकण्याची भाषा होऊ लागली ...

'Dangle' was released, now Boycott's preparation! Know the reason !! | ​‘दंगल’ झाला रिलीज, आता Boycottची तयारी! जाणून घ्या कारण!!

​‘दंगल’ झाला रिलीज, आता Boycottची तयारी! जाणून घ्या कारण!!

िर खान याचा बहुप्रतिक्षीत ‘दंगल’ हा सिनेमा आज  चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि लगेच ‘दंगल’वर बहिष्कार टाकण्याची भाषा होऊ लागली आहे.  होय, टिष्ट्वटरवर ‘Boycott Dangal’ ट्रेंड होत आहे. आता आमिर खान काहीच वादग्रस्त बोललेला नसताना, कुठल्याही वादात नसताना बॉयकॉट दंगल ट्रेंड का होतोय,असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तेच आम्ही सांगतोय.

खरे तर प्रकरण आहे, गतवर्षीचे. होय, गतवर्षी आमिरने असहिष्णुततेबद्दल विधान केले होते. यावरून बराच वाद झाला होता. याच वादामुळे आमिर खानचे काही विरोधेक  ‘Boycott Dangal’  twitterवर ट्रेंड करत आहेत. अर्थात यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनवर काहीही फरक पडणार नाहीय.
 गतवर्षी आमिरने देशातील असहिष्णुतेच्या मुद्यावर एक वादग्रस्त वक्तव करून वाद ओढवून घेतला होता. देशात असहिष्णुता वाढल्याच्या विरोधात अनेक लेखक व कलाकारांनी पुरस्कार वापसी केली होती. आमिरने कथितरित्या याचे समर्थन केले होते. माझी पत्नी किरण मला देश सोडण्यासंदर्भात बोलले होते. ती आपल्या मुलांसंदर्भात चिंतीत आहे, असे तो म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यावरून बराच वाद झाला होता. अर्थात मी असे बोललोच नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असा खुलासा आमिरने केला होता.

आमिर खानच्या बहुर्चित  ‘दंगल’ सिनेमाने भारतीयांनाच नव्हे तर परदेशातील दर्शकांनाही भूरळ घातल्याचे दिसत आहे. भारतासोबतच हा सिनेमा समिक्षणासाठी अमेरिकेमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आला होता. आमिरच्या चर्चित सिनेमाची अमेरिकेत देखील सकारात्मक समीक्षा पाहायला मिळालेयं. परफेक्शनिस्ट आमिरचा आतापर्यंतचा हा सर्वात उत्कृष्ट सिनेमा असल्याचे अमेरिकेमध्ये बोलले जात आहे. 

Web Title: 'Dangle' was released, now Boycott's preparation! Know the reason !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.