​‘दंगल’ गर्ल जायरा वसीमने ‘हिजाब’बद्दल मांडले वेगळे विचार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 13:51 IST2017-10-03T08:21:52+5:302017-10-03T13:51:52+5:30

‘दंगल’ या सुपरडुपर हिट चित्रपटामुळे चर्चेत आलेली काश्मिरी अभिनेत्री जायरा वसीम  अभिनयासोबतच तिच्या परखड विचारांसाठीही ओळखली जाते. उण्यापु-या १९ ...

'Dangal' girl Jaira Wasim different thoughts about 'Hijab'! | ​‘दंगल’ गर्ल जायरा वसीमने ‘हिजाब’बद्दल मांडले वेगळे विचार!

​‘दंगल’ गर्ल जायरा वसीमने ‘हिजाब’बद्दल मांडले वेगळे विचार!

ंगल’ या सुपरडुपर हिट चित्रपटामुळे चर्चेत आलेली काश्मिरी अभिनेत्री जायरा वसीम  अभिनयासोबतच तिच्या परखड विचारांसाठीही ओळखली जाते. उण्यापु-या १९ वर्षांच्या जायराचे स्वत:चे असे काही ठोस विचार आहे. आपले विचार ती वेळोवेळी बोलून दाखवत आलीय. ताजी बातमी म्हणजे, जायराने ‘हिजाब’ घालणा-या महिलांबद्दल भाष्य केले आहे. ‘हिजाब’मध्ये असलेली प्रत्येक महिला वा मुलगी दबावात आहे, असे प्रत्येकवेळी गरजेचे नाही. जी महिला ‘हिजाब’ वा ‘बुर्का’ घालते, ती सरसकट बंधनात असल्याचे मानले जाते. पण अशा अनेक महिला वा तरूणी आहेत, ज्यांना ‘हिजाब’ वा ‘बुर्का’ घालणे मनापासून आवडते. त्यांना ‘हिजाब’ वा ‘बुर्का’ घालायचा आहे. पण त्यांना तसे करू दिले जात नाही. काश्मिरातील अनेक मुली आपल्या मर्जीने ‘हिजाब’ वा ‘बुर्का’ घालतात आणि त्यांचे लग्न होत नाहीयं. यामुळे त्यांचे आई-वडिल त्यांच्यावर ‘हिजाब’ वा ‘बुर्का’ न घालण्यासाठी दबाब टाकतात.  ‘बुर्का’आणि ‘दबाव’ एक स्टीरियाटाईप विचारधारा आहे. ‘हिजाब’ वा ‘बुर्का’ घातलेली प्रत्येक स्त्री पारतंत्र्यात वा बंधनात आहे, हा विचार गैर आहे, असे ती म्हणाली.

मी कधीच ग्लॅमरस भूमिका करू शकत नाही.  मी एका वेगळ्या वातावरणात मोठी झालीयं. माझ्यासाठी अभिनयाचा अर्थ फेम आणि ग्लॅमर असा होत नाही. अभिनय हा माझ्या जीवाभावाचा विषय असून त्यावर मी कधीच डाग लागू देणार नाही, असेही तिने या मुलाखतीवेळी सांगितले.
मध्यंतरी क्रिडामंत्री विजय गोयल यांनी जायरावी तुलना एका पेन्टिंगसोबत केली होती. या पेन्टिंगमध्ये एक महिला बुर्का घालून होती. जायराला ही तुलना अजिबात रूचली नव्हती. मला अशा पेन्टिंगशी जोडले जायला नको, अशा शब्दांत तिने आपली नाराजी व्यक्त केली होती.

ALSO READ : SONG Main Kaun Hoon!! ​आमिर खानच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’चे पहिले गाणे तुम्ही ऐकले?

जायराचा ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. येत्या १९ आॅक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणाºया या चित्रपटात गायक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाºया एका मुलीची कथा आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यात कॅमिओ करताना दिसणार आहे. आमिर हाच या चित्रपटाचा निर्माता आहे.

Web Title: 'Dangal' girl Jaira Wasim different thoughts about 'Hijab'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.