डान्सिंग किंग गोविंदाला मिळेना काम; अखेर ‘हे’ काम करण्यास दिला होकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 16:12 IST2017-08-03T10:42:11+5:302017-08-03T16:12:11+5:30

कॉमेडी, अ‍ॅक्शन आणि इमोशनल अभिनयात भल्याभल्यांना धोबीपछाड देणारा अभिनेता गोविंदा याला पुन्हा एकदा काम मिळणे दुरापास्त झाले आहे. गोविंदाचा ...

Dancing King Govinda gets work; After all, this 'work' has been given to work! | डान्सिंग किंग गोविंदाला मिळेना काम; अखेर ‘हे’ काम करण्यास दिला होकार!

डान्सिंग किंग गोविंदाला मिळेना काम; अखेर ‘हे’ काम करण्यास दिला होकार!

मेडी, अ‍ॅक्शन आणि इमोशनल अभिनयात भल्याभल्यांना धोबीपछाड देणारा अभिनेता गोविंदा याला पुन्हा एकदा काम मिळणे दुरापास्त झाले आहे. गोविंदाचा मार्चमध्ये ‘आ गया हिरो’ हा कमबॅक चित्रपट आला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन गोविंदानेच केले होते. परंतु बॉक्स आॅफिसवर हा चित्रपट अतिशय वाईट पद्धतीने फ्लॉप ठरला. आता पुन्हा एकदा गोविंदा बेरोजगार झाल्याने कामाच्या शोधार्थ त्याची धडपड सुरू आहे. एकेकाळी बॉलिवूडवर राज करणारा हा अभिनेता आता मिळेल ती भूमिका करायची या मानसिकतेतून इंडस्ट्रीमध्ये कामाचा शोध घेत आहे. सूत्रानुसार गोविंदाला एक काम मिळाले असून, ते त्याच्या प्रतिष्ठेला शोभणारे आहे काय? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडल्याशिवाय राहणार नाही. 

वास्तविक ‘आ गया हिरो’ या चित्रपटातून बºयाच वर्षांनंतर पुन्हा एकदा गोविंदाचा पडद्यावर जलवा बघावयास मिळेल, असे त्याच्या चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु तसे घडले नाही. त्यानंतर गोविंदा अनुराग बासू यांच्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात कॅमिओ करताना दिसेल अशी चर्चा रंगली होती. चित्रपटातील त्याचा लूकही समोर आला होता. परंतु काही कारणास्तव अनुराग यांनी गोविंदाचा चित्रपटातून पत्ता कट केला. तेव्हापासून गोविंदा कामाच्या शोधात आहे. कॅमिओ रोलसाठी तरी विचार व्हावा अशी त्याच्याकडून मागणी केली जात आहे. परंतु तसे घडत नसल्याने गोविंदा सध्या हतबल झाल्याचे दिसून येत आहे. 



दरम्यान, गोविंदाची ही अवस्था बघून त्याचा मित्र सलमान खान हा पुन्हा एकदा त्याच्यासाठी धावून आल्याचे समजते. मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमानने गोविंदाच्या हाताला काम मिळवून दिले असून, ‘झलक दिखला जा’ या रिअ‍ॅलिटी शोकरिता त्याचे नाव सुचविले आहे. शोमध्ये तो परीक्षकाच्या भूमिकेत बघावयास मिळेल. यावेळेस ‘झलक दिखला जा’ हा शो ‘बिग बॉस’नंतर सुरू होणार आहे. आतापर्यंत ‘झलक दिखला जा’ आणि ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हे शो ‘बिग बॉस’अगोदर सुरू व्हायचे. परंतु यावेळेस त्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याविषयी आणखी एक बातमी समोर येत आहे की, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोच्या परीक्षकपदी अभिनेता अनुपम खेर बघावयास मिळतील. त्यांच्यासोबत श्रीदेवी आणि मलाइका अरोरा या दोघीदेखील परीक्षक असतील. 

तर सलमान खानचा ‘बिग बॉस सीजन-११’ हा शो ११ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. असो, यासर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे अभिनेता गोविंदा याला काम मिळाले असून, तो आता रिअ‍ॅलिटी शोमध्ये त्याच्या चाहत्यांना बघावयास मिळणार आहे. सध्या गोविंदा त्याच्या परिवारासमवेत विदेशात असल्याचे समजते. तेथून परतल्यानंतर तो या शोवर चर्चा करण्याची शक्यता आहे. 

Web Title: Dancing King Govinda gets work; After all, this 'work' has been given to work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.