पोस्टरवर दिसणारा 'हा' स्टार नेमका कोण? बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत प्रिया बापट झळकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 15:42 IST2026-03-04T15:38:43+5:302026-03-04T15:42:05+5:30

'डाळिंब' या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Dalimb Movie Poster Bollywood Actor Jitendra Kumar Priya Bapat Zee5 | पोस्टरवर दिसणारा 'हा' स्टार नेमका कोण? बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत प्रिया बापट झळकणार!

पोस्टरवर दिसणारा 'हा' स्टार नेमका कोण? बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यासोबत प्रिया बापट झळकणार!

ओटीटीवर एक दमदार थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे.  'डाळिंब' या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला असून पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे पोस्टरमध्ये भयावह आणि पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसणारा अभिनेता नेमका कोण, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पोस्टरवरील हा कलाकार दुसरा तिसरा कुणी नाही तर 'पंचायत' वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता जितेंद्र कुमार हा आहे. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटातूनही त्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता 'डाळिंब'मध्ये तो 'सूरज' ही भूमिका साकारणार आहे. त्याचा इंटेन्स आणि भयावह लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.

विशेष म्हणजे या चित्रपटात मराठी अभिनेत्री प्रिया बापट मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत लक्षवेधी कॅप्शन दिले आहे "होळी फक्त रंगांचा सण नाही, तर एक चेतावनी आहे". 'डाळिंब'मध्ये जितेंद्र कुमार आणि प्रिया बापट यांच्यासोबत क्षितिज दाते, केविन दवे, साई प्रसाद, हरीश कुलकर्णी आणि सागर यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 


सध्या प्रेक्षकांचा कल भयपट, सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटांकडे वाढताना दिसत आहे. 'तुबांड' आणि 'कांतारा'सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. आता 'डाळिंब' चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे ठरेल. हा चित्रपट थेट ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून रिलीज डेट लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
 

Web Title : 'डाळिंब' में जितेंद्र कुमार का खौफनाक रूप; प्रिया बापट भी साथ

Web Summary : 'पंचायत' से मशहूर जितेंद्र कुमार, प्रिया बापट के साथ थ्रिलर 'डाळिंब' में हैं। क्षितिज दाते और अन्य कलाकारों के साथ यह फिल्म ZEE5 पर जल्द ही रिलीज होगी। बापट ने होली को चेतावनी बताया।

Web Title : Jitendra Kumar's intense look in 'Daalimb'; Priya Bapat co-stars.

Web Summary : Jitendra Kumar, famed for 'Panchayat,' stars in the thriller 'Daalimb' alongside Priya Bapat. The film, a suspenseful drama with Kshitij Date and others, will release on ZEE5 soon. Bapat calls Holi a warning.