स्मृती मानधनासोबतचं लग्न मोडल्यानंतर पलाशचा मोठा निर्णय, सलमानच्या अभिनेत्रीसोबत नव्या चित्रपटाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 12:11 IST2026-02-16T12:10:58+5:302026-02-16T12:11:48+5:30
पलाश मुच्छल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

स्मृती मानधनासोबतचं लग्न मोडल्यानंतर पलाशचा मोठा निर्णय, सलमानच्या अभिनेत्रीसोबत नव्या चित्रपटाची घोषणा
Palaash Muchhal : भारतीय क्रिकेटपटूस्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न मोडल्याची चर्चा अजूनही सुरुच आहे. गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर रोजी सांगली येथे दोघांचं धुमधडाक्यात लग्न होणार होतं. संगीत, मेहंदी हे फंक्शन्सही झाले. मात्र अचानक लग्न पुढे ढकलण्यात आल्याची बातमी आली. स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचं आधी सांगण्यात आलं. नंतर पलाशही रुग्णालयात असल्याचं समोर आलं. काही दिवसांनी पलाशने स्मृतीला लग्नाच्या आदल्या रात्रीच धोका दिल्याची बातमी आली आणि एकच खळबळ माजली. यामुळे पलाशला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला. आता पलाश वैयक्तिक आयुष्यातील वाद बाजूला सारून कामावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.
पलाशने आपल्या आगामी थ्रिलर चित्रपटाची घोषणा केली असून, यामध्ये तो सलमान खानच्या नायिकेला मुख्य भूमिकेत घेणार आहे.पलाश मुच्छलच्या या आगामी चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिका साकारणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. आता या चित्रपटात त्याला डेझी शाह हिची साथ लाभणार आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर ही माहिती शेअर केली. महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर पलाशने डेझी शाहला या चित्रपटासाठी साईन केले आहे. डेझीने यापूर्वी सलमान खानसोबत 'जय हो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अद्याप या चित्रपटाचे शीर्षक निश्चित झालेले नाही, मात्र हा एक थरारपट (Thriller) असणार आहे. मुंबईतच या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे.
५ वर्ष सिक्रेट डेटिंग, भर मैदानात प्रपोज आणि धोका
पलाश आणि स्मृती मानधना यांचं नातं जगजाहीर होतं. पलाशने स्मृतीला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर प्रपोज केले होते. यावेळी पलाशची बहीण गायिका पलक मुच्छल आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता. हे तेच मैदान आहे जिथे भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक २०२५ ची ट्रॉफी मानाने जिंकली आणि मिरवली होती. त्याच्या लग्नासाठी चाहते उत्सुक होते. पण,स्मृती आणि पलाशचे लग्न मोडल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर पलाशचे एका तरुणीसोबतचे फ्लर्टी चॅट्सचे काही स्क्रिनशॉर्ट्स व्हायरल झाले. शिवाय, पलाश मुल लग्नाच्या आदल्या रात्री बेडरुममध्ये दुसऱ्या मुलीसोबत सापडला, अशीही चर्चा होती.