"पलाश हा खूप चांगला माणूस" स्मृती मानधनाशी लग्न तुटल्यानंतर डेझी शाहने केलं कौतुक; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 11:05 IST2026-02-26T11:04:02+5:302026-02-26T11:05:19+5:30

सलमान खानसोबत काम केलेली अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर-कोरिओग्राफर डेजी शाहने पलाश आणि त्याच्या कुटुंबियांचं कौतुक केलं आहे.

Daisy Shah Calls Palaash Muchhal A Very Good Person amid Smriti Mandhana Wedding Controversy Palak Muchhal | "पलाश हा खूप चांगला माणूस" स्मृती मानधनाशी लग्न तुटल्यानंतर डेझी शाहने केलं कौतुक; म्हणाली...

"पलाश हा खूप चांगला माणूस" स्मृती मानधनाशी लग्न तुटल्यानंतर डेझी शाहने केलं कौतुक; म्हणाली...

गेल्या वर्षात सर्वात चर्चेत राहिलेली गोष्ट म्हणजे भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न. गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर रोजी सांगली येथे दोघांचं धुमधडाक्यात लग्न होणार होतं. संगीत, मेहंदी हे फंक्शन्सही झाले. मात्र अचानक लग्न पुढे ढकलण्यात आल्याची बातमी आली. यानंतर पलाश मुच्छल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पलाशवर फसवणुकीचे आरोप करण्यात आले आणि त्यानंतर सोशल मीडियावरही त्याला बरंच ट्रोल करण्यात आलं. यातच आता सलमान खानसोबत काम केलेली अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर-कोरिओग्राफर डेजी शाहने पलाश आणि त्याच्या कुटुंबियांचं कौतुक केलं आहे.

पलाश मुच्छल त्याचा पहिला सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. या सिनेमात डेझी शाह आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहेत. या निमित्तानं नुकतंच 'फिल्मी ज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत डेझीने पलाशबद्दलचे तिचे मत मांडले. ती म्हणाली, "पलाशचं कुटुंब अतिशय सुसंस्कृत आणि साधे आहे. हे कुटुंब देवावर आणि श्रद्धेवर खूप विश्वास ठेवते, जो एक अत्यंत सकारात्मक गुण आहे".

डेझीने सांगितले की, पलाशची बहीण पलक मुच्छल हिच्यामुळे तिची पलाशशी ओळख झाली.  ती म्हणाली, "पलाश हा व्यक्ती म्हणून खूप चांगला आहे. मी त्याला दोन-चार वेळा भेटले आहे. पलकने माझ्या 'जय हो' या चित्रपटासाठी गाणं गायलं होतं, त्यामुळे तेव्हापासून मी तिला ओळखते. पलकच्या घरी पार्ट्यांना आणि गणपती पूजाला माझं जाणं-येणं असतंच. तिथेच माझी भेट पलाश मुच्छलशी झाली. तो संगीतकार आणि दिग्दर्शक आहे, हे तेव्हाच मला समजलं होतं".


५ वर्ष सिक्रेट डेटिंग, भर मैदानात प्रपोज 

पलाश आणि स्मृती मानधना यांचं नातं जगजाहीर होतं. पलाशने स्मृतीला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर प्रपोज केले होते. हे तेच मैदान आहे जिथे भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक २०२५ ची ट्रॉफी मानाने जिंकली आणि मिरवली होती. त्याच्या लग्नासाठी चाहते उत्सुक होते. पण,स्मृती आणि पलाशचे लग्न मोडल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर पलाशचे एका तरुणीसोबतचे फ्लर्टी चॅट्सचे काही स्क्रिनशॉर्ट्स व्हायरल झाले. शिवाय, पलाश मुल लग्नाच्या आदल्या रात्री बेडरुममध्ये दुसऱ्या मुलीसोबत सापडला, अशीही चर्चा होती.  दोघांनीही अखेर पोस्ट करत नातं संपल्याची घोषणा केली होती. वैयक्तिक आयुष्यातील या खडतर प्रसंगातून दोघेही बाहेर पडत आहेत.  दिग्दर्शकाच्या भूमिकेत पलाश पहिल्यांदाच दिसणार आहे. तर स्मृतीने क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रीत केलं.
 

Web Title : स्मृति मंधाना से ब्रेकअप के बाद डेज़ी शाह ने पलाश की प्रशंसा की।

Web Summary : डेज़ी शाह ने पलाश मुच्छल के परिवार की प्रशंसा करते हुए उन्हें संस्कारी बताया। स्मृति मंधाना से ब्रेकअप और निर्देशन की शुरुआत के बीच उन्होंने पलाश के चरित्र की सराहना की। पलाश से उनकी मुलाकात उनकी बहन पलक के जरिए हुई।

Web Title : Daisy Shah praises Palash after split with Smriti Mandhana.

Web Summary : Daisy Shah commended Palash Muchhal's family, calling them cultured and devout. She met Palash through his sister Palak, praising his character amidst his directorial debut and prior controversy surrounding his split from Smriti Mandhana.