डेझीला मिळाले गिफ्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 00:32 IST2016-03-13T07:32:17+5:302016-03-13T00:32:17+5:30
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान याने इंडस्ट्रीत एक इमेज बनवली आहे. त्याच्यासोबत नेहमी चर्चेत राहायला आवडणारे सेलिब्रिटी देखील अनेक आहेत. ...
डेझीला मिळाले गिफ्ट!
ब लीवूड सुपरस्टार सलमान खान याने इंडस्ट्रीत एक इमेज बनवली आहे. त्याच्यासोबत नेहमी चर्चेत राहायला आवडणारे सेलिब्रिटी देखील अनेक आहेत. त्यात एक महत्त्वाचे नाव म्हणजे ‘डेझी शाह’. डेझीला म्हणे सलमानने नुकतीच एक महागडी कार गिफ्ट केली आहे. डेझी सल्लूच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे. तिने सलमानच्या ‘जय हो’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. सलमान खानचा २०१५ मधील ‘बजरंगी भाईजान’ चित्रपट अत्यंत हिट ठरला होता. तो सध्या ‘सुल्तान’ चित्रपटासाठी खुप चर्चेत आहे.