डॅडी तुषार कपूरने म्हटले, लक्ष्य खूपच अॅक्टिव्ह आहे, स्कूलमध्ये करतोय एन्जॉय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 17:32 IST2017-08-09T12:02:31+5:302017-08-09T17:32:31+5:30
सिंगर वडील बनलेला बॉलिवूड अभिनेता तुषार कपूूर याचा मुलगा लक्ष्य एक वर्षाचा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच लक्ष्यचा वाढदिवस जल्लोषात ...

डॅडी तुषार कपूरने म्हटले, लक्ष्य खूपच अॅक्टिव्ह आहे, स्कूलमध्ये करतोय एन्जॉय!
स ंगर वडील बनलेला बॉलिवूड अभिनेता तुषार कपूूर याचा मुलगा लक्ष्य एक वर्षाचा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच लक्ष्यचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी तुषारने एका पार्टीचे आयोजनही केले होते. पार्टीत बरेचसे सेलिब्रिटी उपस्थित होते. करिना कपूर-खान तिच्या चिमुकल्या तैमूरला घेऊन बर्थ-डे पार्टीत उपस्थित होती. तैमूर आणि लक्ष्यमध्ये चांगली गट्टी जमल्याचीही बातमी समोर आली होती. दरम्यान तुषारने लक्ष्यचे प्रायमरी स्कूलमध्ये नुकतीच अॅडमिशन घेतली असून, लक्ष्य स्कूलमध्ये खूप एन्जॉय करीत असल्याचे तुषार सांगतो.
तुषारने म्हटले की, ‘मी लक्ष्यला दोन वर्षाचा झाल्यानंतर प्रायमरी स्कूलमध्ये पाठविण्याचा विचार करीत होतो; मात्र माझ्या असे लक्षात आले की, गेल्या काही महिन्यांपासून तो खूपच अॅक्टिव्ह झाला आहे. जेव्हा मी त्याला शिकवितो, तेव्हा तो खूपच लक्ष देऊन ऐकतो. त्यामुळेच त्याला स्कूलमध्ये टाकण्याचा मी निर्णय घेतला. तो खूप अॅक्टिव्ह आहे. त्याची स्मरणशक्ती खूपच चांगली आहे. जेव्हा मी त्याच्यातील या गुणांचे निरीक्षण केले तेव्हाच त्याला चाइल्ड प्रीस्कूलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला.
![]()
१ आॅगस्ट लक्ष्यचा शाळेतील पहिला दिवस होता. यावेळी लक्ष्य स्कूलमधील वातावरण खूपच एन्जॉय करीत होता. स्कूलमधील इतर मुलांची कंपनी त्याला खूपच भावली. तो स्कूलमध्ये असा काही रमला होता की, त्याला जणू काही स्कूलची ओढ लागली असावी. सध्या तुषार त्याच्या आगामी गोलमाल सीरिजच्या ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या शूटिंगबरोबरच तो लक्ष्यचीही प्रचंड काळजी घेत असतो. जेव्हा त्याला वेळ मिळतो तेव्हा तो लक्ष्यला वेळ देणे पसंत करतो.