डॅडी हृतिकची मुलांसोबत स्पेनला ट्रीप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 23:41 IST2016-03-13T06:41:47+5:302016-03-12T23:41:47+5:30

स्पेनला मुले रेहान आणि हिृदानसोबत ट्रीपला जायचं म्हणून डॅडी हृतिक रोशनने आगामी चित्रपट ‘मोहंजोदारो’ ची शूटींग पुढे ढकलली आहे. ...

Daddy Hrithik's Spaniard trip with the kids! | डॅडी हृतिकची मुलांसोबत स्पेनला ट्रीप!

डॅडी हृतिकची मुलांसोबत स्पेनला ट्रीप!

पेनला मुले रेहान आणि हिृदानसोबत ट्रीपला जायचं म्हणून डॅडी हृतिक रोशनने आगामी चित्रपट ‘मोहंजोदारो’ ची शूटींग पुढे ढकलली आहे. कुटुंब कामाच्या अगोदर येते, हे हृतिकच्या वागण्यावरून कळते. सुत्रांनुसार, हृतिकला स्पेनला एका जाहीरातच्या शूटसाठी जायचे होते. त्याच्या मुलांनाही तो सोबत घेऊन जाणार होता. त्याचे जाहीरातीचे काम झाल्यानंतर तो त्यांच्यासोबत तिथे वेळ घालवणार होता. आणि नंतर मग घरी जाणार होता.

 पण, मोहंजोदारोची शूटिंग त्याने वडीलांचा चित्रपट काबीलसाठी पुढे ढकलली असल्याची अफवा पसरले होते. तसेच चर्चा अशीही आहे की, आमीर खान ‘दंगल’ची रिलीज होण्याची तारीख थोडी अगोदरची घेणार आहे. आणि मोहंजोदारो १५ आॅगस्टला रिलीज होणार होता. त्यामुळे एकाच दिवशी दोन्ही चित्रपट रिलीज होऊ नयेत असे हृतिकला वाटतेय. त्याला आमीरसोबत बॉक्स आॅफीसवर टक्कर घ्यायची नाही.

Web Title: Daddy Hrithik's Spaniard trip with the kids!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.