​‘डब्बा गुल’ म्हणजे केवळ अफवा - वरुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 17:06 IST2016-09-27T11:36:34+5:302016-09-27T17:06:34+5:30

मध्यंतरी असे कळाले होते की, वरुण धवन आणि अमिताभ बच्चन एका चित्रपटात काम करणार आहेत. ‘डब्बा गुल’ अशा नावाच्या ...

'Dabba Gul' means only rumor - Varun | ​‘डब्बा गुल’ म्हणजे केवळ अफवा - वरुण

​‘डब्बा गुल’ म्हणजे केवळ अफवा - वरुण

्यंतरी असे कळाले होते की, वरुण धवन आणि अमिताभ बच्चन एका चित्रपटात काम करणार आहेत. ‘डब्बा गुल’ अशा नावाच्या सिनेमात वरुण प्रथमच मेगास्टार बच्चनसोबत दिसणार म्हटल्यावर याची चांगलीच चर्चा झाली.

पण स्वत: वरुणने या बातमीचे खंडन केले. तो म्हणाला की, ‘अजून या चित्रपटाच्याबाबतीत कोणताच अंतिम निर्णय झालेला नाही. मीडियामध्ये केवळ अफवा आहेत.’

यशराज बॅनरच्या या सिनेमाचे दिग्दर्शन प्रदीप सरकार करणार असून एक एमबीए शिकलेला विद्यार्थी मुंबईच्या डबेवाल्यांसोबत दोन महिने काम करून त्यांच्या कामाची पद्धत समजून घेतो अशा आशयाची त्याची कथा आहे. लवकरच याबाबत घोषणा करण्यात येणार आहे.

Web Title: 'Dabba Gul' means only rumor - Varun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.