- म्हणून सलमानने लावलाय शर्टलेस फोटो शेअर करण्याचा सपाटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 10:59 IST2019-10-25T10:59:12+5:302019-10-25T10:59:56+5:30
नुकताच ‘दबंग 3’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि रिलीज होताच व्हायरल झाला. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. अगदी या ट्रेलरप्रमाणेच सलमानच्या शर्टलेस फोटोंनीही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

- म्हणून सलमानने लावलाय शर्टलेस फोटो शेअर करण्याचा सपाटा
सलमान खानचा ‘दबंग 3’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि रिलीज होताच व्हायरल झाला. सध्या हा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. अगदी या ट्रेलरप्रमाणेच सलमानच्या शर्टलेस फोटोंनीही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमानने शर्टलेस फोटो शेअर करण्याचा जणू सपाटा लावला. सोशल अकाऊंटवर अलीकडे त्याने अनेक शर्टलेस फोटो शेअर केले. आता असे करण्यामागच्या कारणाचा खुलासा त्याने केला आहे.
होय, ‘दबंग 3’च्या ट्रेलर लॉन्चवेळी त्याने हा खुलासा केला. त्याने सांगितले की, चित्रपटात माझी बॉडी बघून अनेकांना ही सगळी व्हीएफएक्सची कमाल असल्याचे वाटते. भाईची बॉडी अशी असूच शकत नाही, असे लोक समजतात. पण ही माझी खरी बॉडी आहे, हे मला लोकांना सांगायचे होते. चुलबुल पांडेच्या भूमिकेसाठी मी प्रचंड मेहनत केली. जिममध्ये प्रचंड घाम गाळला.
‘दबंग 3’ हा ‘दबंग’ फ्रॅन्चाइजीचा तीसरा चित्रपट आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या दोनही चित्रपटांनी बॉक्सआॅफीसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटांमध्ये सलमान खान व सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत होते. ‘दबंग 3’मध्ये सलमान व सोनाक्षी मुख्य भूमिकेत आहेत.
याशिवाय मराठी सुपरस्टार महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही देखील या चित्रपटामध्ये अभिनय करताना दिसेल. दबंग चित्रपट मालिकेत सलमानने चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट फ्लॅशबॅक फॉरमॅटमध्ये तयार केला गेला आहे