'दबंग ३'चे मध्यप्रदेशमधील संपले शूटिंग, समोर आला 'चुलबुल पांडे'चा दमदार लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 12:45 IST2019-04-12T12:33:27+5:302019-04-12T12:45:59+5:30

बॉलिवूडचा दबंग खान सलमान सध्या 'दबंग ३' चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे. नुकतेच त्याचे मध्य प्रदेशमधील चित्रीकरण संपले आहे.

Dabangg 3 shoots out of Madhya Pradesh; Looks like 'Chulbul Pandey' looks fantastic | 'दबंग ३'चे मध्यप्रदेशमधील संपले शूटिंग, समोर आला 'चुलबुल पांडे'चा दमदार लूक

'दबंग ३'चे मध्यप्रदेशमधील संपले शूटिंग, समोर आला 'चुलबुल पांडे'चा दमदार लूक


बॉलिवूडचा दबंग खान सलमान सध्या 'दबंग ३' चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे. नुकतेच त्याचे मध्य प्रदेशमधील चित्रीकरण संपले आहे. ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे आणि तिथल्या सेटवरील फोटोदेखील शेअर केला आहे. सलमान गेल्या १२ दिवसांपासून मध्यप्रदेशमधील महेश्वर येथे दबंग ३चे चित्रीकरण करत होता. या चित्रीकरणावरून वादही निर्माण झाले होते.


वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतानाही सलमान खानने महेश्वरमधील 'दबंग ३'चे चित्रीकरण पूर्ण केले.

या आठवड्याच्या सुरूवातीला त्याने चित्रपटातील शीर्षक गीत 'हुड हुड दबंग...' गाणे शूट केले.

सुरूवातीला हा चित्रपट शिवलिंग वादात अडकला. त्यावेळी 'दबंग३'च्या सेटवरचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत एक शिवलिंग लाकडाच्या चौकटीने झाकलेले दिसत होते. हा फोटो व्हायरल होताच लोकांनी सेटवर गोंधळ घातला होता. केवळ इतकेच नाही तर सोशल मीडियावर यावर नाराजीचा सूर उमटला होता. त्यासाठी सलमानला माफी मागावी लागली होती. 


इतकेच नाही तर भारतीय पुरातत्व विभागाने 'दबंग ३'च्या प्रोडक्शन टीमला नोटीस पाठवली असून त्यात नर्मदा नदीजवळच्या किल्ल्यातील प्राचीन मूर्तींना नुकसान पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

'दबंग ३'चे दिग्दर्शन प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक प्रभू देवा करतो आहे.

यात पुन्हा एकदा सलमान खानसोनाक्षी सिन्हा ही जोडी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 'दबंग' फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. येत्या डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Dabangg 3 shoots out of Madhya Pradesh; Looks like 'Chulbul Pandey' looks fantastic