दबंग ३ : सलमान खानसोबत शाहरुखची ‘पत्नी’ करणार रोमान्स?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 10:58 IST2016-12-22T10:58:36+5:302016-12-22T10:58:36+5:30

वाचून हैराण झाला ना? शाहरुख आणि सलमानचा खूप दोस्ताना आहे हे माहितीए; पण किंग खानची ‘पत्नी’ सल्लूमियांशी आगामी ‘दबंग ...

Dabang 3: Romance to make Shahrukh's 'wife' with Salman Khan? | दबंग ३ : सलमान खानसोबत शाहरुखची ‘पत्नी’ करणार रोमान्स?

दबंग ३ : सलमान खानसोबत शाहरुखची ‘पत्नी’ करणार रोमान्स?

चून हैराण झाला ना? शाहरुख आणि सलमानचा खूप दोस्ताना आहे हे माहितीए; पण किंग खानची ‘पत्नी’ सल्लूमियांशी आगामी ‘दबंग ३’मध्ये रोमान्स करणार म्हणजे काय? तुम्ही आणखी काही विचार करण्यापूर्वी आम्हीच तुम्हाला सांगतो की, अखेर संपूर्ण गोष्ट काय आहे.

सर्वप्रथम तर ‘दबंग’ सिरीजमधील तिसऱ्या भागात शाहरुखची धर्मपत्नी गौरी  नाही तर त्याची आॅनस्क्रीन पत्नीची भूमिका केलेली एक अभिनेत्री सलमान खानची हीरोईन असेल. एसआरकेसोबत फॅन चित्रपटात काम केलेली अ‍ॅक्ट्रेस वलूशा डिसूजाची ‘दबंग ३’मध्ये वर्णी लागल्याची जोरदार चर्चा आहे.

या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘फॅन’मध्ये वलूशा सुपरस्टार शाहरुखची पत्नी बनली होती. मॉडेलिंगच्या दुनियेत सक्रीय असणाऱ्या वलूशाला मोठ्या पडद्यावर काम करण्याचे वेध लागले आहे. म्हणून तर तिने आता सलमानवर निशाना साधला. आजकाल सलमान-वलूशा एकत्र पार्टी करताना दिसतात. ‘फॅन’नंतर चांगल्या चित्रपटाच्या शोधात असणाऱ्या वलूशाला सलमानने आॅफर दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

waluscha de sousa model
दबंग गर्ल? : वलूशा डिसूजा​

अरबाज खानने ‘दबंग ३’ची घोषणा केल्यापासून या चित्रपटात मुख्य अभिनेत्री कोण असणार याविषयी अनेक तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हा असणार की नाही याविषयी प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान परिणीती चोप्राचेनाव चर्चेत आले. मग काजोल ‘दबंग ३’मध्ये नकारात्मक भूमिका करणार अशी अफवा उठली. २०१८ साली ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे.

सध्या ‘ट्युबलाईट’च्या शूटींगमध्ये व्यस्त असणारा सलमान त्यानंतर ‘टायगर जिंदा है’चा प्रोजेक्ट हाती घेणार आहे. २०१७च्या शेवटी ‘दबंग ३’ची शूटींग सुरू होईल. हा चित्रपट ‘दबंग २’चा सिक्वेल नसून पहिल्या दबंगचा प्रिक्वेल आहे. म्हणजे यामध्ये चुलबुल पांडे रॉबिनहुड पांडे कसा बनला हे दाखवण्यात येणार आहे. सलमानच्या सांगण्यावरून दोनदा कथेमध्ये बदल करण्यात आले. साजीद-वाजीदऐवजी ‘दबंग ३’ला हिमेश रेशामियाचे संगीत असणार आहे.

मुन्नी दिसणार का?

Malaika Arora Khan as Munniमुन्नी बदनाम हुई : मलायका अरोरा

cnxoldfiles/a> होत असताना या चित्रपटात तिचे आयटम नंबर असेल का याविषयी शंका आहे. आणि ती जर नसेल तर दुसरी कोणती अभिनेत्री तिची जागा घेईल हे पाहणेसुद्धा औत्सुकतेचे ठरेल. तसे पाहिले तर ‘दबंग’ सिरीजमधील आयटम साँग्समुळे खूप विवाद झाले आहेत. ‘फेव्हिकॉल से’ हे गाणे महिलांना केवळ उपभोगाची वस्तू म्हणून सादर करते. ‘मैं तो तंदुरी मुर्गी हूं यार, गटका ले पिया अल्कोहोल से’ असे जेव्हा लहान मुलं ऐकतात, गातात तेव्हा खूप वाईट वाटते, अशी टीका शबाना आझमी यांनी केली होती.

Web Title: Dabang 3: Romance to make Shahrukh's 'wife' with Salman Khan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.