मलायका अरोराच्या टी शर्ट वरील हा मेसेज खास अर्जुन कपूरसाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 18:10 IST2019-05-01T18:09:01+5:302019-05-01T18:10:01+5:30

नुकतेच मलायका अरोराला वांद्रे येथील एका योगा स्टुडिओच्या बाहेर पाहण्यात आले. त्यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घातला होता.

Is this cute message on Malaika Arora's t-shirt for beau Arjun Kapoor? | मलायका अरोराच्या टी शर्ट वरील हा मेसेज खास अर्जुन कपूरसाठी?

मलायका अरोराच्या टी शर्ट वरील हा मेसेज खास अर्जुन कपूरसाठी?

ठळक मुद्देया टी शर्टवर लव्ह असे लिहिले होते. तिचा हा टी शर्ट पाहून तिच्या टी शर्टवरील हा खास मेसेज अर्जुनसाठी आहे का अशी चर्चा रंगली आहे.

मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी जितकी ओळखली जाते, तितकीच तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. ती तिच्या स्टायलिश कपड्यांमधले तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियालवर पोस्ट करत असते. मलायका पार्टींमध्ये जितके स्टायलिश कपडे घालते, तितक्याच स्टायलिश कपड्यांमध्ये तिला जिमला अथवा योगाला जाताना देखील पाहाण्यात येते. तिच्या लुकची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगलेली असते. तिला नुकतेच वांद्रे येथील एका योगा स्टुडिओच्या बाहेर पाहण्यात आले. त्यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घातला होता. या टी शर्टवर लव्ह असे लिहिले होते. तिचा हा टी शर्ट पाहून तिच्या टी शर्टवरील हा खास मेसेज अर्जुनसाठी आहे का अशी चर्चा रंगली आहे.

मलायकाला जिम स्टुडिओच्या बाहेर पाहाण्यात आले त्यावेळी तिने केस बांधले होते आणि गॉगल घातला होता. ती नेहमी प्रमाणेच या लुकमध्ये देखील खूपच छान दिसत होती. तिचा या लुक मधील फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या रिलेशनशीमुळे जास्त चर्चेत आहेत. अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाच्या चर्चा मीडियात रंगल्या होत्या. ईस्टरच्या वीकेंडला ते दोघे लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. पण मीडियाने लावलेला हा तर्क चुकीचा ठरला. काही दिवसांपूर्वीच मलायका मालदीवमध्ये आपल्या गर्ल गँग सोबत व्हॅकेशनवर गेली होती.अर्जुनसुद्धा या ट्रीपमध्ये जॉईन झाला होता. रिपोर्टनुसार मलायकाची ही लग्नाआधीची बॅचलर पार्टी होती. त्यामुळेच त्यांच्या लग्नाच्या चर्चांना ऊत आला होता. पण बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत मलायकाने सांगितले होते की, या सर्व चर्चांमध्ये काहीच तथ्य नाहीये. 

करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. तर या आधी अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिले होते.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले अर्जुन ‘पानीपत’मध्ये दिसणार आहे. आशुतोष गोवारीकर या सिनेमाचे दिग्दर्शन करतोय. ज्यात त्याच्यासोबत संजय दत्त आणि क्रिती सॅनन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 


 
 

Web Title: Is this cute message on Malaika Arora's t-shirt for beau Arjun Kapoor?