गोंडस चेहरा असणारा नायक: जॉय मुखर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2017 18:39 IST2017-02-19T13:09:29+5:302017-02-19T18:39:29+5:30

गोंडस चेहºयाचा आणि गोबºया गालाचा अतिशय सोज्वळ नायक म्हणून जॉय मुखर्जी यांच्याकडे पाहिले जाते. पिढीजात चित्रपट व्यवसायात असल्याने त्यांना ...

Cute face with a face: Joy Mukherjee | गोंडस चेहरा असणारा नायक: जॉय मुखर्जी

गोंडस चेहरा असणारा नायक: जॉय मुखर्जी

ंडस चेहºयाचा आणि गोबºया गालाचा अतिशय सोज्वळ नायक म्हणून जॉय मुखर्जी यांच्याकडे पाहिले जाते. पिढीजात चित्रपट व्यवसायात असल्याने त्यांना संधीही चांगल्या मिळाल्या. ६० च्या दशकातील महागडा अभिनेता म्हणूनही जॉय यांची ओळख होती. अभिनेत्री नीलम यांच्याशी लग्न करून त्यांनी सुखाचा संसार केला. मरेपर्यंत हे दोघेही एकत्र राहिले. या दोघांची केमिस्ट्री जुळून आली होती.



वयाच्या २१ व्या वर्षी ‘लव्ह इन शिमला’ या चित्रपटातून त्यांनी कारकीर्दीस प्रारंभ केला. या चित्रपटात साधना त्यांच्या अभिनेत्री होत्या. जॉय यांचे वडील शशधर मुखर्जी हे प्रसिद्ध निर्माते आणि फिल्मालय स्टुडिओचे सहसंस्थापक होते. सुबोध मुखर्जी, अशोक कुमार, अनुप कुमार आणि किशोर कुमार हे त्यांचे काका. साधना कट आणि जॉय यांचे बूट खूप गाजले. हा चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर अनेक मुली त्याच्या प्रेमात पडल्या. त्यांचा गोंडस मुलासारखा चेहरा सर्वांना भावला.
त्यानंतर त्यांनी आशा पारेख यांच्यासोबत अनेक चित्रपट केले. इक मुसाफिर इक हसीना, जिद्दी, शागीर्द, फिर वोही दिल लाया हुँ सारखे चित्रपट त्यांनी तयार केले. लव्हन इन शिमला आणि लव्ह इन टोकियो सारखे चित्रपट गोल्डन ज्युबिली झाले. 



त्यांचे लग्न अभिनेत्री नीलम यांच्यासोबत झाले. याबाबत बोलताना नीलम म्हणाल्या, ते शशधर मुखर्जी यांचे चिरंजीव होते. त्यांच्याकडे खूप पैसा होता. लव्ह इन मुंबई या चित्रपटात त्यांना नुकसान झाले. या चित्रपटासाठी त्यांनी सर्व प्रॉपर्टी, मालमत्ता पणाला लावली होती. यावेळी त्यांच्याविरुद्ध ३७ केसेस होत्या. त्यांनी हे सर्व चुकविले आणि पुन्हा चित्रपटात काम करण्यास सुरूवात केली. 
ते आपल्या अभिनेत्रींची गंमतही खूपदा करायचे. सायरा बानो यांनी जेंव्हा दिलीप कुमार यांच्याशी लग्न केले, त्यावेळी ते म्हणाले, आता तुझे लग्न अभिनयाच्या देवाशी झाले आहे. तुला आता नक्कीच अभिनय येईल. त्यावर सायरा म्हणाल्या, ‘जॉय के बच्चे...’ त्यानंतरही अनेकदा त्यांच्यासोबत त्यांची लुटूपुटीची लढाई होत असे. 


जिद्दी चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना त्यांनी एकदा आशा पारेख यांना बेडवर अक्षरश: फेकले. त्या बेडवर गादी नव्हती. परिणामी आशा पारेख यांच्या पाठीला दुखापत झाली. तरीही आशा पारेख सारे काही विसरून काम करण्यास तयार झाल्या.
जॉय मुखर्जी यांनी एकूण ३२ चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले. त्यापैकी २० चित्रपट सुपरहिट झाले. पहिला आणि शेवटचा चित्रपट सुपरहिट झाला आहे असे ते बॉलिवूडमधील एकमेव अभिनेते असावेत. आजच्या काळातील काजोल आणि तनिषा मुखर्जी यांचे ते काका. ९ मार्च २०१२ साली वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.











Web Title: Cute face with a face: Joy Mukherjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.