‘वीरे दी वेडिंग’साठी करिना व सोनमने कमी केली फीस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 11:44 IST2016-10-05T06:14:53+5:302016-10-05T11:44:53+5:30
‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या मार्गात एक ना अनेक अडचणी येऊ पाहत आहेत. आधी या चित्रपटाचे शूटींग उशीरा सुरु ...

‘वीरे दी वेडिंग’साठी करिना व सोनमने कमी केली फीस!
‘ ीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या मार्गात एक ना अनेक अडचणी येऊ पाहत आहेत. आधी या चित्रपटाचे शूटींग उशीरा सुरु झाले आणि आता या चित्रपटातील दोन अभिनेत्रींना त्यांची फीस कमी करावी लागल्याची खबर आहे. होय, या दोन अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर आणि करिना कपूर. ‘वीरे दी वेडिंग’ हा सोनमची बहीण रिया कपूर हिचा चित्रपट आहे, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. बहिणीच्या या चित्रपटासाठी सोनमला तिचे मानधन कमी करावे लागले. ‘वीरे दी वेडिंग’साठी मला व करिनाला इतरांच्या तुलनेत बरेच कमी पैसे मिळाले, असे खुद्द सोनमनेच सांगितले. मी व माझी बहीण रिया आम्ही दोघी करिनासोबत मिळून ‘वीरे दी वेडिंग’सारखा महिला प्रधान चित्रपट बनवतो आहोत. मात्र यासाठी आम्हाला जे मानधन मिळाले, ते अपेक्षेपलीकडचे आहे. करिना, मला व रियाला सुद्धा आमची फीस कमी करावी लागली. मला या गोष्टीचे दु:ख आहे. वाईट वाटते आहे, असेही सोनम म्हणाली. हाच धागा पकडून हिरोईन्सला हिरोच्या तुलनेत कमी मानधन मिळते, याबद्दलचे दु:खही सोनमने बोलून दाखवले. आता सोनमला समजावणारे आपण कोण? सोनमने स्वत:च या दु:खातून सावरणे बरे! होय ना??