'क्रू' आता ओटीटीवर घालणार धुमाकूळ; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 09:54 AM2024-04-19T09:54:47+5:302024-04-19T09:59:40+5:30

 'क्रू' च्या ओटीटी अधिकारांची माहिती समोर आली आहे. 

Crew OTT Release Date: When And Where To Watch Tabu, Kareena Kapoor, Kriti Sanon's Movie | 'क्रू' आता ओटीटीवर घालणार धुमाकूळ; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

'क्रू' आता ओटीटीवर घालणार धुमाकूळ; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

नुकत्याच रिलीज झालेल्या 'क्रू' (Crew) सिनेमात करीना कपूर खान (Kareena Kapoor), तब्बू (Tabu) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) झळकल्या. तिघींनी सिनेमात एअर हॉस्टेसची भूमिका साकारली. 'क्रू' या चित्रपटाने चाहत्यांची मने चांगलीच जिंकली आहेत. प्रेक्षक आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट बघत आहेत. ज्या प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहिला आहे, ते OTT वर पुन्हा त्याचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहेत. यातच आता  'क्रू' च्या ओटीटी अधिकारांची माहिती समोर आली आहे. 

अक्षय कुमारचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि अजय देवगणचा 'मैदान यासारखे मोठे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही चाहत्यांमध्ये 'क्रू'ची क्रेझ संपत नाहीये.  कमी बजेटच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्यानंतर  'क्रू' लवकरच ओटीटवर प्रदर्शित होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Netflix ने 'क्रू' चे OTT अधिकार विकत घेतले आहेत. चित्रपटाची स्ट्रीम डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर ऑनलाइन स्ट्रीम होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

 नेटफ्लिक्सने 'क्रू'चे हक्क मोठ्या रकमेत विकत घेतल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या कराराची रक्कम अद्याप समोर आलेली नाही. सिनेमात तब्बू, करीना आणि क्रिती व्यतिरिक्त यात दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा देखील दिसत आहेत. या चित्रपटात तिन्ही अभिनेत्री एअर होस्टेसच्या भूमिकेत आहेत. तिघेही काम करणाऱ्या विमान कंपनीच्या दिवाळखोरीमुळे त्यांना सहा महिन्यांपासून पगार मिळत नाही, त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. तिन्ही कारभाऱ्यांनी मिळून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि इथून कथेला नवे वळण मिळते. खुर्चीला खिळवून ठेवणारा सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर करण्यात सिनेमाची टीम यशस्वी झाली आहे.

Web Title: Crew OTT Release Date: When And Where To Watch Tabu, Kareena Kapoor, Kriti Sanon's Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.