झोया अख्तरचाही बंगला झाला सील, संपूर्ण परिसर करण्यात आले सॅनेटाईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 17:03 IST2020-07-14T16:57:15+5:302020-07-14T17:03:22+5:30
रेखा यांच्या बंगल्याच्या शेजारीच झोयाचा बंगला आहे. दोन्ही बंगले जवळजवळ असल्यामुळे खबरदारी म्हणून झोयाचाही बंगला सील केला आहे.

झोया अख्तरचाही बंगला झाला सील, संपूर्ण परिसर करण्यात आले सॅनेटाईज
बॉलिवूड दिग्दर्शक झोया अख्तर यांचा बंगलाही आता सील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रेखा यांच्या बंगल्याच्या शेजारीच झोयाचा बंगला आहे. दोन्ही बंगले जवळजवळ असल्यामुळे खबरदारी म्हणून झोयाचाही बंगला सील केला आहे.महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घर सॅनिटाईज करण्यासाठी एक नवीन पथक पाठविले होते. पथकाने बंगल्या बाहेरच्या भागाला सॅनिटाईज केले. सुरक्षा रक्षकांचे केबिनही सॅनिटाईज केले आहे.
अख्तर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
काही दिवसांपूर्वीच रेखा यांच्या बंगल्याचा सेक्युरिटी गार्ड कोरोना पॉझीटीव्ह आल्याने संपूर्ण बंगलाच सॅनेटाईज केल्यानंतर सील करण्यात आला होता. परिसरात फलकही लावण्यात आले होते.
अलीकडेच बोनी कपूर आणि आमीर खान यांच्या घरात काम करणा-या स्टाफला कोरोनाची लक्षणं आढळल्यामुळे योग्य खबरादरी घेत सा-यांनाचा होम क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. त्यापाठोपाठ बीग बी अमिताभ बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे रूग्णलयात भरती करण्यात आले. त्यांचाही बंगला सील करण्यात आला आहे.