मल्लिका शेरावत आणि तिच्या बॉयफ्रेंडला कोर्टाने दिला झटका, घर खाली करण्याचे दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 13:11 IST2018-01-10T07:39:27+5:302018-01-10T13:11:54+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून मल्लिका शेरावत बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर आहे. काही वर्षांपूर्वी ती भारतातून फ्रांसला शिफ्ट झाली आहे. मात्र सध्या ...

Court ordered Mallika Sherawat and her boyfriend, ordered to drop down the house | मल्लिका शेरावत आणि तिच्या बॉयफ्रेंडला कोर्टाने दिला झटका, घर खाली करण्याचे दिले आदेश

मल्लिका शेरावत आणि तिच्या बॉयफ्रेंडला कोर्टाने दिला झटका, घर खाली करण्याचे दिले आदेश

ल्या अनेक दिवसांपासून मल्लिका शेरावत बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दूर आहे. काही वर्षांपूर्वी ती भारतातून फ्रांसला शिफ्ट झाली आहे. मात्र सध्या ती एक वेगळ्या अडचणीत सापडली आहे. कोर्टाने तिला भाड्याचे घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. मल्लिकावर घर मालकाचे  ८० हजार युरो म्हणजे सुमारे ६४ लाख रुपए भाडे थकीत आहे. घराचे भाडे न दिल्याने कोर्टाने घरातून बाहेर पडायले आणि सगळे फर्निचर जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.  

मल्लिका शेरावर पेरिसमधल्या एका पॉश परिसरात रहाते.  तिचा फ्रेंच बॉयफ्रेन्ड साइरिल आॅक्जेनफेन्स सोबत ती तिकडे राहते.  गतवर्षी 14 डिसेंबरला कोर्टाने दोघांना घर भाडे चुकते करण्याचे आदेश दिले होते.  घर मालकाचे म्हणणे आहे कि मल्लिकाने मला फक्त एकदाच 2715 यूरोचे भाडे दिले होते. त्यानंतर तिने एकही पैसा दिला नाही. 14 नोव्हेंबर 2017 ला पेरिस कोर्टात सुनावणी दरम्यान मल्लिकाच्या वकीलाने सांगितले होते की तिची आणि तिच्या बॉयफ्रेंडची आर्थिक परिस्थिती ठिक नाहीय. वकिलाने पुढे हेही सांगितले होते सध्या मल्लिकाला काम मिळत नाही आहे त्यामुळे तिला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मात्र घर मालकाने हे आरोप फेटाळून लावले तो म्हणाला मल्लिकाने त्याच्या घरात राहत असताना लाखो डॉलरची कमाई केली आहे. ती खोट बोलते आहे.   

कोर्टाच्या निर्णयामुळे 31 मार्च 2018 पर्यंत मल्लिकाला सुट मिळाली आहे. फ्रांसमधल्या नियमानुसार जास्त थंडी असल्यामुळे 31 मार्चपर्यंत तिला घराबाहेर काढू शकत नाही. त्यामुळे तिला जर त्याआधी घराबाहेर काढले तर ते नियमांच्या बाहेर आहे. 

ALSO RAED :  मल्लिका शेरावतने बराक ओबामा यांना हरियाणात येण्यासाठी दिले निमंत्रण, वाचा नेमके काय आहे प्रकरण!

मल्लिका शेरावत दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डर्टी पॉलिटीक्स’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. यानंतर २०१६ मध्ये ‘टाइम राइडर्स’ या चीनी चित्रपटात ती झळकली होती.   ‘मर्डर गर्ल’ नावाने प्रसिद्ध झालेली मल्लिका ‘मर्डर’,‘किस किस की किस्मत’, ‘प्यार के साईड इफेक्ट्स’,‘गुरू’,‘हिस्स’ अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत दिसलेली आहे. ‘द मिथ’ या विदेशी चित्रपटात जॅकी चॅनसोबत तिने काम केलेय. 

Web Title: Court ordered Mallika Sherawat and her boyfriend, ordered to drop down the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.