CoronaVirus: मॉडेलिंग सोडून रुग्णांवर उपचार करतेय ही मिस इंग्लंड, पेशाने आहे डॉक्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 16:26 IST2020-04-07T16:25:36+5:302020-04-07T16:26:33+5:30
मिस इंग्लंड भाषा मुखर्जीच्या या निर्णयाचं सगळीकडून खूप कौतूक होत आहे.

CoronaVirus: मॉडेलिंग सोडून रुग्णांवर उपचार करतेय ही मिस इंग्लंड, पेशाने आहे डॉक्टर
2019 साली मिस इंग्लंडचा किताब जिंकणारी मॉडेल भाषा मुखर्जी पेशाने डॉक्टर आहे. सध्या तरी तिने तिचा मिस इंग्लंडचा मुकूट बाजूला ठेवून कोरोना व्हायरसशी लढा देणाऱ्या इंग्लंडमधील लोकांच्या मदतीसाठी डॉक्टर म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. त भाषा आधी ज्या हॉस्पिटलमध्ये कामाला होती तिथे ती सध्या काम करत आहे.
आपल्या डॉक्टरी पेशातून ब्रेक घेऊन मॉडेलिंग क्षेत्रात आलेल्या भाषाने आता निश्चित केले आहे की कोरोना व्हायरसच्या संकटात ती तिच्या महत्त्वकांक्षा बाजूला ठेवून डॉक्टरची जबाबदारी पार पडत आहे.
मिस इंग्लंडचा किताब जिंकल्यानंतर भाषा मुखर्जीने काही देशांमध्ये चॅरिटीसाठी निमंत्रण दिले होते. याच कामासाठी ती मागील महिन्यात भारतात आली होती. 24 वर्षीय भाषा मुखर्जी भारतीय वंशज असून तिने भारतातील प्रवासादरम्यान कित्येक शाळांना भेट दिली होती. तिने विद्यार्थ्यांसाठी पुस्तके आणि अभ्यासाच्या गोष्टी दिल्या होत्या. याशिवाय ती तुर्की, आफ्रिका आणि पाकिस्तानमध्ये देखील गेली होती.
वयाच्या नवव्या वर्षी इंग्लंडमध्ये स्थलांतरीत झालेल्या भाषाने शिक्षण इथेच पूर्ण केले. जगातील विविध देशात फिरून आलेली मुखर्जीला तिथल्या डॉक्टर मित्रांकडून तिथल्या परिस्थितीबद्दल सातत्याने मेसेज मिळत होते. त्यानंतर इंग्लंडमधील कोरोनाचा वाढते संकट पाहून भाषाने पुन्हा डॉक्टरी पेशात परतण्याचे ठरविले.
भाषा मुखर्जीचे म्हणणं आहे की मी मिस इंडिया असले तरी माणूसकीच्या नात्याने हे काम करते आहे. जेव्हा जगभरात कोरोना व्हायरसमुळे इतके लोक मरत आहेत आणि तिचे डॉक्टर मित्र इतकी मेहनत घेत आहेत. तर मी मुकूट परिधान करून फिरणे योग्य नाही. त्यामुळे महत्त्वकांक्षा मागे ठेवून डॉक्टर असण्याचे कर्तव्य पार पाडत आहे.