कोरोना रूग्ण सापडल्यानंतर बिल्डिंग सील, अभिनेत्री आई-वडिलांच्या काळजीने चिंतीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 13:48 IST2020-04-03T13:48:07+5:302020-04-03T13:48:16+5:30
मुंबईच्या लोखंडवाला भागात बुधवारी संध्याकाळी एक कोरोनाबाधित रूग्ण आढळला आणि यानंतर बीएमसीने अख्खी इमारत सील केली.

कोरोना रूग्ण सापडल्यानंतर बिल्डिंग सील, अभिनेत्री आई-वडिलांच्या काळजीने चिंतीत
कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. लोकांनी आपआपल्या घरात राहावे, सोशल डिस्टेंसिंग पाळावे, यासाठी जनतेला प्रेरित केले जातेय. अर्थात याऊपरही कोरोना बाधितांची संख्या वाढतेय. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. मुंबईच्या लोखंडवाला भागात बुधवारी संध्याकाळी एक कोरोनाबाधित रूग्ण आढळला आणि यानंतर बीएमसीने अख्खी इमारत सील केली. या इमारतीत बॉलिवूड अभिनेत्री आहना कुमरा हिचे आई-वडील राहतात. तूर्तास अहाना आई-वडिलांच्या चिंतेने चिंतीत आहे.
मिड डेशी बोलताना अहानाने ही चिंता बोलून दाखवली. माझे आईवडिल राहत असलेली बिल्डींग पूर्णपणे सील करण्यात आली आहे. याघडीला हे सगळे करणे गरजेचे आहे, हे मला ठाऊक आहे. पण तरीही आईवडिलांच्या काळजीने माझी चिंता वाढली आहे. माझे सगळ्यात मोठी चिंता माझे वडील आहेत. कारण ते डायबेटिक आहेत. समाधानाची गोष्ट म्हणजे, बिल्डींगच्या गेटवर औषधे पुरवण्यात येत आहेत. माझ्या आईवडिलांनी गरजेचे सामान स्टॉक केले आहे. पण स्थिती लांबली तर सगळेच कठीण होईल. आम्ही कॉल करून एकमेकांला धीर देत आहोत. पण अशावेळी मी त्यांच्यासोबत नाही, हा विचार करून मला अपराध्यासारखे वाटू लागलेय. सध्या मी माझ्या बहीणीसोबत घाटकोपरला राहतेय.
लिपस्टिक अंडर माय बुरखा, द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर यांसारख्या चित्रपटात अभिनेत्री अहाना कुमरा झळकली होती. प्रेक्षकांना तिच्या दोनही सिनेमांमधील भूमिकांना पसंती दिली होती.
सुशांत सिंगही राहतो याच इमारतीत
अभिनेता सुशांत सिंगही याच सोसायटीत राहतो. त्याच्या सोसायटीत कोरोना बाधित रूग्ण आढळल्यानंतर तो सुद्धा आपल्या कुटुंबासोबत अडकून पडला आहे.