फराह खान वैतागली; बॉलिवूड स्टार्सवर बरसली! कारण वाचून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 15:29 IST2020-03-26T15:27:43+5:302020-03-26T15:29:39+5:30
स्टार्सला चक्क दिली धमकी

फराह खान वैतागली; बॉलिवूड स्टार्सवर बरसली! कारण वाचून बसेल धक्का
कोरोना व्हायरस वेगाने पसरत असल्यामुळे सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनाच घरी बसण्याची वेळ आली. यादरम्यान सगळे घरात कुठल्या ना कुठल्या पद्धतीने स्वत:ला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करताहेत. काही सेलिब्रिटी घरात राहून घर काम करतानाचे व्हिडीओ पोस्ट करत आहेत तर काही जण फिटनेस व्हिडीओ शेअर करत आहेत. जणू सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या फिटनेस व्हिडीओंचा पूर आला आहे. सेलिब्रिटींच्या या फिटनेस व्हिडीओला चाहते वैतागले की नाहीत, ठाऊक नाही़. पण फराह खान मात्र जाम वैतागली आहे.
होय, दिग्गज कोरिओग्राफर, डायरेक्टर फराह खानने एक व्हिडीओ अपलोड करून आपला वैताग व्यक्त केला आहे. ‘हाय मी फराह खाऩ सगळे लोक घरात राहून व्हिडीओ बनवत आहेत. त्यामुळे मी सुद्धा व्हिडीओ बनवला. जनहितार्थ जारी या व्हिडीओतून मी एक विनंती करतेय. होय, कृपया सर्व सेलिब्रिटी व स्टार्सनी वर्कआऊट व्हिडीओ बनवणे बंद करा शिवाय आम्हाला विनाकारण यात टॅग करणही थांबवा. या जागतिक संकटादरम्यान फिगर मेनटेन करण्याशिवाय तुम्हाला अन्य कुठलीही काळजी नाही, याचा मला आनंदच आहे. पण आपल्यापैकी अनेकांना किंबहुना बहुतेकांना याशिवायही काळजीचे अनेक विषय आहेत. तेव्हा प्लीज आमच्यावर दया करा आणि वर्कआऊट व्हिडीओ बंद करा. असे करू शकत नसाल तर मी तुम्हाला अनफॉलो केल्यास वाईट वाटू देऊ नका. सुरक्षित राहा,‘ असे फराह खान या व्हिडीओत म्हणतेय.
‘बंद करो ये वर्कआऊट व्हिडीओ’, असे फराह खानने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे. फराहचा हा व्हिडीओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी लाईक व शेअर केला आहे.
आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी स्वत:चे वर्कआऊट व्हिडीओ शेअर केले आहेत. कतरीना कैफपासून तर करण सिंग ग्रोव्हरपर्यंत अनेक जण यात आहेत.