Corona Virus:बॉलिवूडच्या अभिनेत्रीच्या आईने घेतला कोरोनाग्रस्तांसाठी पुढाकार, अशी करते दिवसरात्र सेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 14:57 IST2020-03-24T14:56:32+5:302020-03-24T14:57:12+5:30
कोरोनाचा वाढता पादुर्भावामुळे सेलिब्रिटीदेखील फॅन्सना सुरक्षित राहण्याचा सल्ला देत आहेत.

Corona Virus:बॉलिवूडच्या अभिनेत्रीच्या आईने घेतला कोरोनाग्रस्तांसाठी पुढाकार, अशी करते दिवसरात्र सेवा
कोरोना व्हायरसच्या वाढत्या कहरामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळेच सोशल मीडियावर सेलिब्रिटीदेखील फॅन्सना सुरक्षित राहण्याचा सल्ला देत आहेत. मानुषी छिल्लरनेदेखील कोरोनापासून बचावासाठी एक घरीच राहा, संकटापासून दूर राहा.अवेअरनेस मॅसेज इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मानुषीने आधीच भारताची मान जागतिक पातळीवर अभिमाने उंचावली आहे. हरियाणाच्या मानुषी छिल्लरनं मिस वर्ल्ड हा किताब जिंकला आहे.यानंतर तसेच ती आता लवकरच बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. इतकेच नाहीतर सध्या ती वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लरची आई डॉ. नीलम छिल्लर दिल्लीमध्ये कोरोना व्हायरस विरुद्ध मेडिकल ड्यूटीवर आहेत. याची माहिती स्वतः मानुषीने सोशल मीडियावर दिली. तिने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये पिता डॉ. मित्रा बसु छिल्लर यांचेही कौतुक केले आहे, जे आईच्या गैरउपस्थितीत घरातील काम उत्तमपणे सांभाळत आहेत. सोबतच मानुषीने हे देखील सांगितले की, तिने वडिलांना सरप्राइज करण्यासाठी घरी जेवण बनवले.सारं भारावून टाकणारं होतं.
तसेच नेहमीच मानुषी मिस वर्ल्ड संस्थेच्या माध्यमातून जे काही करता येईल ते करायला आवडेल असे सांगत असते. द ब्युटी विद पर्पज हा किताब मी जिंकला आहे त्यामुळे मासिक पाळी स्वच्छतेसंदर्भात संदर्भात मला काम पुढे न्यायचं आहे. अस तिने दिलेल्या मुलाखीतत म्हटले होते.